Home बातम्या 11 डिसेंबरला भारतात लॉन्च होईल 5,000एमएएच बॅटरी आणि 6जीबी रॅम असलेला असूस झेनफोन मॅक्स प्रो एम2

11 डिसेंबरला भारतात लॉन्च होईल 5,000एमएएच बॅटरी आणि 6जीबी रॅम असलेला असूस झेनफोन मॅक्स प्रो एम2

असूस झेनफोन मॅक्स बद्दल समोर आलेल्या अनेक लीक्स मधून समजले होते की कंपनी या फोनची सुरवात इंडोनेशिया मधून करेल आणि 11 डिसेंबरला इंडोनेशियन बाजारात लॉन्च होताच हा फोन टेकविश्वात प्रवेश करेल. अशा होती की इंडोनेशिया मध्ये लॉन्च झाल्यांनतर काही दिवसांनी असूस हा दमदार फोन भारतात पण आणेल. पण आपल्या फॅन्सचा उत्साह पाहून असूस कंपनी झेनफोन मॅक्स प्रो एम2 भारतात 11 डिसेंबरला लॉन्च करत आहे. असूस इंडिया ने झेनफोन मॅक्स प्रो एम2 च्या भारतीय लॉन्चची तारीख सांगितली आहे आणि हा फोन 11 डिसेंबरला देशात लॉन्च केला जाईल.

असूस इंडिया ने अपने आॅफिशियल ट्वीटर हँडल वरून झेनफोन मॅक्स प्रो एम2 च्या लॉन्चची माहिती दिली आहे. असूस ने सांगितले आहे की कपंनी येत्या 11 डिसेंबरला भारतात एका ईवेंटचे आयोजन करेल आणि याच ईवेंटच्या मंचावरून झेनफोन मॅक्स प्रो एम2 स्मार्टफोन इंडिया मध्ये लॉन्च केला जाईल. लॉन्च डेट सोबत असूस ने सांगिलते आहे की हा फोन फ्लिपकार्ट एक्सक्लूसिव असेल, म्हणजे हा फोन फक्त फ्लिपकार्ट वरून विकत घेता यईल.

असूस झेनफोन मॅक्स प्रो एम2 ची एक टीजर ईमेज इंटरनेट वर वायरल झाली आहे ज्यात 5,000एमएएच बॅटरीचा उल्लेख करण्यात आला आहे. झेनफोन मॅक्स प्रो एम2 बद्दल हे कंफर्म झाले आहे की असूस हा फोन 5,000एमएएच च्या मोठ्या बॅटरी सह लॉन्च करेल जी क्वालकॉम क्विक चार्ज 3.0 फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येईल. तसेच असूस झेनफोन मॅक्स प्रो एम2 नॉच डिस्प्ले लॉन्च केला जाईल हे पण असूस आधीच सांगितले आहे.

लीकनुसार हा फोन 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या 6.26-इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्ले सह लॉन्च केला जाऊ शकतो. लीकनुसार कंपनी या फोन मध्ये 4जीबी रॅम देईल सोबत हा 64जीबी तसेच 128जीबी स्टोरेजच्या दोन आॅप्शन मध्ये लॉन्च होईल. तर काही रिपोर्ट्स मध्ये बोलले जात आहे की असूस भारतात झेनफोन मॅक्स प्रो एम2 6जीबी रॅम सह लॉन्च केला जाऊ शकतो.

लीकनुसार असूसचा हा फोन एंडरॉयड ओरियो वर सदर केला जाईल सोबतच हा क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 660 चिपसेट वर चालेल. लीक मध्ये सांगण्यात आले आहे की झेनफोन मॅक्स प्रो एम2 च्या बॅक पॅनल वरील डुअल रियर कॅमेरा सेंसर मध्ये एक सेंसर 12-मेगापिक्सलचा असेल तर दुसरा सेंसर 5-मेगापिक्सलचा असेल. तसेच झेनफोन मॅक्स प्रो एम2 मध्ये 13-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळणार असल्याचे समोर आले आहे.

असूस 11 डिसेंबरला हा फोन भारतीय बाजारात लॉन्च करेल. झेनफोन मॅक्स प्रो एम2 ची किंमत किती असेल आणि कधी देशात सेल साठी उपलब्ध होईल, यासाठी 11 डिसेंबरची वाट बघितली जात आहे.