Home बातम्या 11 डिसेंबरला लॉन्च होईल असूसचा 3 रियर कॅमेरे असलेला झेनफोन मॅक्स प्रो एम2

11 डिसेंबरला लॉन्च होईल असूसचा 3 रियर कॅमेरे असलेला झेनफोन मॅक्स प्रो एम2

असूसची झेनफोन सीरीजच्या आगामी डिवाईस झेनफोन मॅक्स प्रो एम2 ची टेक बाजारात सुरु आहे. दीर्घकाळापासून झेनफोन मॅक्स प्रो एम2 तसेच झेनफोन मॅक्स एम2 बद्दल लीक्स येत आहेत. झेनफोन मॅक्स प्रो एम2 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असेल हे कंफर्म झाले आहे, म्हणजे या फोनच्या बॅक पॅनल वर 3 कॅमेरा सेंसर देण्यात येतील. तर आज या दमदार फोनची लॉन्च डेट समोर आली आहे. असूस झेनफोन मॅक्स प्रो एम2 येत्या 11 डिसेंबरला जागतिक टेक मंचावर येत आहे.

असूस ने आपला इंडोनेशियन ट्वीटर हँडल वरून झेनफोन मॅक्स प्रो एम2 च्या लॉन्च डेटचा खुलासा केला आहे. असूस ने ट्वीट करून सांगितले आहे कि डिसेंबरच्या 11 तारखेला झेनफोन मॅक्स प्रो एम2 इंडोनेशिया मध्ये सादर केला जाईल. आपल्या आपल्या ट्वीट मध्ये असूस ने झेनफोन मॅक्स प्रो एम2 गेमिंग फोन असल्याचे सांगितले आहे. कंपनी ने फोनच्या लॉन्च डेट व्यतिरिक्त फोनच्या स्पेसिफिकेशन्स व वेरिंएट्स संबंधित इतर माहिती अजूनतरी गोपनीय ठेवली आहे, जिचा खुलासा 11 डिसेंबरलाच होईल.

असूस झेनफोन मॅक्स प्रो एम2 चे स्पेसिफिकेशन्स पाहता लीकनुसार हा फोन 6-इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्ले सह लॉन्च केला जाऊ शकतो. लीक नुसार कंपनी या फोन मध्ये 4जीबी रॅम दिला जाईल सोबत 64जीबी मेमरी तसेच 128जीबी स्टोरेजच्या चे दोन आॅप्शन मध्ये लॉन्च होईल. असूस आपला हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 660 चिपसेट सह लॉन्च कर शकते.

लीक मध्ये झेनफोन मॅक्स प्रो एम2 च्या बॅक पॅनल वरील ​तीन रियर कॅमेरा सेंसर किती पावर चे असतील हे सांगण्यात आले नाही. पण या फोन मध्ये 13-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा असल्याची बाब या लीक मध्ये सांगण्यात आली आहे. तसेच झेनफोन मॅक्स एम2 बद्दल बोलायचे तर लीक नुसार कंपनी हा स्मार्टफोन पण 6-इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्ले सह लॉन्च करेल.

झेनफोन मॅक्स एम2 पण 4जीबी रॅम सह सादर केला जाऊ शकतो सोबत हा फोन 32जीबी तसेच 64जीबी च्या दोन स्टोरेज वेरिएंट्स मध्ये सेल साठी उपलब्ध होईल. असूसच्या या फोन मध्ये क्वालकॉम चा स्नॅपड्रॅगॉन 636 चिपसेट मिळू शकतो. झेनफोन मॅक्स एम2 च्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. तर सेल्फी साठी या फोन मध्ये पण 13-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो.

असूस झेनफोन मॅक्स प्रो एम2 इंडियन मार्केट मध्ये कधी येईल हे आतातरी सांगता येणार नाही. पण बोलले जात आहे कि झेनफोन मॅक्स प्रो एम2 झेडबी634केएल मॉडेल नंबर सह बाजरात येईल.