बजाज ऑटोनं आपल्या लोकप्रिय इलेक्ट्रिक स्कूटर चेतक (bajaj chetak electric) च्या किंमतीत वाढ केली आहे. जर तुम्ही देखील ही बॅटरी असलेली स्कूटर विकत घेण्याची योजना बनवत असाल तर आता तुम्हाला 9 टक्के जास्त किंमत (bajaj chetak electric scooter price hike) द्यावी लागेल. कंपनीनं साल 2020 च्या सुरुवातीला आपल्या लोकप्रिय स्कूटर चेतकचा इलेक्ट्रिक अवतार सादर केला होता. ग्राहकांनी देखील या स्कूटरला चांगला प्रतिसाद दिला होता. अलीकडेच कंपनीनं चेतक स्कूटरच्या विक्रीसाठी 75 शहरांमध्ये आपली डीलरशिप (bajaj chetak electric booking) वाढवण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, आता या स्कूटरची किंमत वाढवल्यामुळे ग्राहक निराश होऊ शकतात.
Bajaj Chetak Electric New Price
Bajaj Chetak चे दोन व्हेरिएंट भारतात उपलब्ध आहेत, ज्यांची नावं अर्बन आणि प्रीमियम अशी आहेत. परत्नू जुलैपासून या इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमतीत एकूण 12,749 रुपयांची वृद्धी करण्यात आली आहे. त्यामुळे या बॅटरी असलेल्या स्कूटरची किंमत 1.41 लाखांवरून 1.54 लाख रुपये झाली आहे. हे देखील वाचा: फक्त 10,599 रुपयांमध्ये घरी घेऊन या 140 किलोमीटर रेंज असलेली इलेक्ट्रिक स्कूटर
Bajaj Chetak ची वैशिष्टये
बाजारात उपलब्ध असलेल्या बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 3kWh क्षमतेची IP67 रेटेड लिथियम-आयऑन बॅटरी पॅकचा वापर करण्यात आला आहे. यात देण्यात आलेली इलेक्ट्रिक मोटर 4kW ची पावर आणि 16Nm पीक टॉर्क जेनरेट करते. या बॅटरीवर कंपनी सात वर्ष किंवा 70 हजार किलोमीटरची वाॅरंटी देते. तसेच 50 हजार किलोमीटर आणि तीन वर्षांच्या बॅटरी वाॅरंटीचा प्लॅनही आहे.
यात ईको आणि स्पोर्ट असे दोन ड्रायव्हिंग मोड देण्यात आले आहेत. बजाज चेतक एकदा चार्ज केल्यावर इको मोडमध्ये 90 km ची रेंज देते. त्याबरोबरच 70 किलोमीटर प्रतितास टाॅप स्पीड मिळते. नाॅर्मल चार्जरनं चार्ज केल्यास ही बॅटरी पाच तासात फुल चार्ज होते. फास्ट चार्जरच्या मदतीनं एक तासात 25 टक्के चार्ज मिळतो.
स्कूटरच्या फ्रंट व्हिलमध्ये डिस्क ब्रेक आणि रिअर व्हिलमध्ये ड्रम ब्रेकचं काॅबिनेशन देण्यात आलं आहे. डिजिटल स्पीडोमीटर, डिजिटल ऑडोमीटर, डिजिटल ट्रिप मीटर, रिपोर्ट स्टार्ट, पुश बटण स्टार्ट-स्टाॅप आदी फिचर्स स्कूटरमध्ये मिळतात. विजेवर चालणाऱ्या या चेतक स्कूटरमध्ये फुल एलईडी लाइटिंग, इल्यूमिनेटेड स्विचगियर, ब्लूटूथ-इनेबल्ड इंस्ट्रूमेंट कंसोल आणि स्मार्टफोन अॅप फंक्शंस सारखे फीचर्स मिळतात. हे देखील वाचा: अर्ध्या तासात 80 टक्के चार्जिंग; 418km ची दमदार रेंज असलेली Electric SUV Car येतेय भारतात
Bajaj Chetak Electric Scooter 2022
Bajaj Chetak EV लाँच करणारी Bajaj Auto कंपनी आता पुन्हा एकदा भारतात आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर आणण्याची तयारी करत आहे. बातमीनुसार, ही नवीन विजेवर चालणारी ई-स्कूटर स्कूटर बजाज चेतकचा अपग्रेडेड परंतु स्वस्त व्हर्जन असेल. ज्यात 4.2kW चा पिक आउटपुट देण्याची क्षमता असेल. सध्या बजाज चेतक ईवी 2020 बाजारात जवळपास 1.48 लाखांमध्ये उपलब्ध असली तरी देशात नवीन मॅन्युफॅक्चरिंग यूनिट सुरु झाल्यानंतर बजाजच्या इलेक्ट्रिक स्कूटर्सची किंमत कमी होऊ शकते.
