Home टॉप कलेक्शन 10,000 च्या बजेट मध्ये टॉप 5 शाओमी फोन्स

10,000 च्या बजेट मध्ये टॉप 5 शाओमी फोन्स

शाओमी भारतातील नंबर 1 स्मार्टफोन निर्माता कंपनी बनली आहे. कंपनीचे फोन भारतीय यूजर हातोहात घेतात. सर्वात खास बाब शी कि प्राइस नुसार शाओमीच्या स्पेसिफिकेशनची बरोबरी कोणीच करू शकत नाही. कंपनीने सुरवातीपासून कमी बजेट ध्यानात ठेवला आहे आणि आज पण असेच आहे. 10 हजारच्या बजेट मध्ये पण कंपनीकडे दमदार फोन आहेत. पुढे आम्ही अशाच 5 दमदार फोन्सची माहिती दिली नाही.

शाओमी Redmi 7

अलीकडे शाओमी ने कमी किंमतीत Redmi 7 मॉडेल भारतात लॉन्च केला आहे. फोन मध्ये 19:9 आस्पेक्ट रेशियो वाली 6.26 इंचाची सक्रीन आहे जिचे ​स्क्रीन रेजल्यूशन 1520 × 720 पिक्सल आहे. फोनची स्क्रीन कोर्निंग गोरिल्ला 5 कोटेड आहे. कंपनी ने हा क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 632 चिपसेट वर सादर केला आहे आणि फोन मध्ये 1.8 गीगाहट्र्ज चा ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. हा फोन 2जीबी रॅम सह 16जीबी मेमरी, 3जीबी रॅम सह 32जीबी मेमरी मध्ये उपलब्ध आहे. फोन मध्ये फोटोग्राफी साठी एफ/2.2 अपर्चर सह 12-मेगापिक्सल + 2-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. पावर बॅकअप साठी 4,000 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

शाओमी Redmi Y3

10 हजार रुपयांपेक्षा कमी मध्ये शाओमीचा Redmi Y3 पण दमदार फोन आहे. हा फोन कंपनी ने खासकरून सेल्फी साठी सादर केला आहे. या फोन मध्ये 6.26-इंचाचा एचडी+ आईपीएस डिस्प्ले आहे जो गोर्निंग गोरिल्ला ग्लास कोटेड आहे. फोन वॉटरड्रॉप नॉच सह सादर केला गेला आहे. शाओमी Redmi Y3 क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 632 चिपसेट वर चालतो आणि यात 1.8गीगाहट्र्ज चा प्रोसेसर आहे. फोटोग्राफी साठी Redmi Y3 के रियर मध्ये AI डुअल कॅमेरा सेटअप आहे. फोन मध्ये 12-मेगापिक्सल + 2-मेगापिक्सल रियर कॅमेरा देण्यात आला आहे तर सेल्फी साठी 32 एमपी चा फ्रंट कॅमेरा आहे. पावर बॅकअप साठी 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

शाओमी Redmi Note 7

शाओमी Redmi Note 7 पण चांगला फोन आहे. एंडरॉयड 9 पाई सह सादर करण्यात आलेल्या या फोन मध्ये 6.3—इंचाची फुल एचडी+ स्क्रीन देण्यात आली आहे जी कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 कोटेड आहे. प्रोसेसिंग साठी Redmi Note 7 क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 660 चिपसेट वर सादर केला गेला आहे जो या रेंज मधील बेस्ट प्रोसेसर आहे. सोबत 3जीबी रॅम आणि 32जीबी स्टोरेज आहे. फोटोग्राफी साठी फोन मध्ये 12-मेगापिक्सलचा सॅमसंग प्राइमरी सेंसर तथा 2-मेगापिक्सलचा डेफ्थ-सेंसिग कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये पण 13-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. Redmi Note 7 मध्ये पण पावर बॅकअप साठी 4,000एमएएच की दमदार बॅटरी देण्यात आली आहे जी फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

शाओमी Redmi Go

कमी किंमतीत शाओमीचा Redmi Go फोन पण काफी खूप चांगला म्हणता येईल. या फोन मध्ये 5-इंचाची एचडी स्क्रीन आहे. कंपनीने हा क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 425 चिपसेट वर सादर केला आहे आणि यात 1.4गीगाहट्र्ज चा क्वॉडकोर प्रोसेसर मिळेल. सोबत 1जीबी रॅम मेमरी आणि 8जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. हा फोन एंडरॉयड ऑपरेटिंग सिस्टम 8.1 गो एडिशन वर चालतो. फोटोग्राफी पाहता यात 8-मेगापिक्सलचा सिंगल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच फ्रंट कॅमेरा 5-मेगापिक्सलचा आहे. पावर बॅकअप साठी फोन मध्ये 3,000 एमएएच की बॅटरी देण्यात आली आहे. बॅटरी पण थोडी कमी आहे.

शाओमी Redmi 6A

शाओमी Redmi 6A थोडा जुना झाला आहे पण आता पण चांगला ऑप्शन आहे. या फोन मध्ये 5.45—इंचाची एचडी+ (720 x 1440 पिक्सल रेजल्यूशन) स्क्रीन दिली आहे. हा फोन 18:9 आसपेक्ट रेशियो वाले फुल व्यू डिसप्ले सह येतो. फोन मीयूआई 9 वर चालतो जो एंडरॉयड ऑपरेटिंग सिस्टम 8.1 ओरियो आधारित आहे. कंपनी ने हा मीडियाटेक हेलिया ए22 चिपसेट सह सादर केला आहे. फोन मध्ये 2.0गीगाहट्र्ज चा प्रोसेसर आहे. यात 2जीबी रॅम मेमरी सह 16जीबी व 32जीबी इंटरनल स्टोरेज आहे. फोटोग्राफी साठी Redmi 6A मध्ये 13-मेगापिक्सलचा रियर आणि 5—मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा आहे. पावर बॅकअप साठी कंपनी ने यात 3,000 एमएएच ची बॅटरी दिली आहे.