POCO X5 Pro 5G संबंधित बातमी अलीकडेच समोर आली होती ज्यात सांगण्यात आलं होतं की हा मोबाइल फोन चीनमध्ये लाँच झालेल्या Redmi Note 12 Pro Speed Edition चा रीब्रँडेड व्हर्जन असू शकतो. तसेच आता हा पोको फोन भारतीय सर्टिफिकेशन्स साइट BIS म्हणजे ब्यूरो ऑफ इंडियन स्टॅंडर्डवर लिस्ट झाला आहे. या लिस्टिंग नंतर चर्चाना उधाण आलं आहे की पोको एक्स5 प्रो 5जी फोन लवकरच भारतात लाँच होऊ शकतो. हा एक गेमिंग फोनच्या स्वरूपात येईल ज्यात तासंतास गेमिंगसाठी 12 लेयर असलेला कूलिंग सिस्टम दिली जाऊ शकते.
POCO X5 Pro 5G बीआयएस वर 22101320I मॉडेल नंबरसह लिस्ट करण्यात आला आहे. फक्त हीच भारतीय साइट नव्हे तर थायलंडच्या सर्टिफिकेशन साइट NBTC आणि EEC वर देखील हा पोकोफोन स्पॉट झाला आहे. एक्स5 प्रो 5जीच्या या सर्टिफिकेशन्समध्ये 2210132G मॉडेलसह लिस्ट करण्यात आला आहे. कंपनीनं अद्याप फोन लाँचबद्दल कोणतीही माहिती दिली नाही परंतु मार्केटमध्ये चर्चा आहे की हा पोको फोन या महिन्याच्या अखेरीस किंवा फेब्रुवारीच्या सुरुवातीला भारतात लाँच होऊ शकतो.
पोको एक्स5 प्रो चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स
- 6.67″ AMOLED 120Hz Display
- 12GB RAM + 256GB Storage
- Qualcomm Snapdragon 778G
- 108MP Rear + 16MP Selfie Camera
- 67W + 5,000mAh Battery
वर सांगितल्याप्रमाणे भारतात येणारा पोको एक्स5 प्रो चीनमध्ये लाँच झालेल्या रेडमी नोट 12 प्रो स्पीड एडिशनचा रीब्रँडेड व्हर्जन असू शकतो. त्यामुळे नोट 12 प्रो एसई पाहता चीनमध्ये आलेला हा स्मार्टफोन 2400 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.67 इंच फुलएचडी+ पंच-होल डिस्प्लेसह लाँच झाला आहे जो अॅमोलेड पॅनलवर बनला आहे तसेच 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करतो.
स्नॅपड्रॅगन 778जी हा गेमिंग चिपसेट रेडमी नोट 12 प्रो स्पीड एडिशनमध्ये देण्यात आला आहे. सिक्योरिटीसाठी फोनच्या साइड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी हा स्मार्टफोन 67वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो.
Redmi Note 12 Pro Speed Edition मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. याच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 108MP Samsung HM2 प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो 8 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सल मॅक्रो लेन्ससह येतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
