Home बातम्या एयरटेल चा सर्वात मोठा डाव : फक्त 193 रुपयांमध्ये मिळेल 90जीबी 4जी डाटा

एयरटेल चा सर्वात मोठा डाव : फक्त 193 रुपयांमध्ये मिळेल 90जीबी 4जी डाटा

देशातील सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपन्या सध्या आपल्या यूजर्स साठी एका पेक्षा एक चांगले प्लान सादर करत आहेत. कुठे ना कुठे तरी हे पण सर्वांना माहित आहे की या हे चांगले प्लान्स आणून कंपनीला बाजारातील स्पर्धेत टिकून राहायचे आहे. टेलीकॉम बाजारातील सर्वात वेगाने पुढे जाणारी टेलीकॉम कंपनी ​रिलायंस जियो च्या विरोधात आता देशातील सर्वात मोठी दूरसंचार कपंनी एयरटेल उभी राहिली आहे. जियो ने एडआॅन पॅक सादर केल्यानंतर आता एयरटेल पण धमाकेदार पॅक घेऊन आली आहे जो यूजर्सना फक्त 193 रुपयांमध्ये 90जीबी डाटा 4जी स्पीड वर देतो.

एयरटेल ने 193 रुपयांचा एडआॅन पॅक सादर केला आहे. हा एडआॅन वेगळा आणि खास आहे. बातमीनुसार एयरटेल एडआॅन पॅक मध्ये 193 रुपयांमध्ये रोज 1जीबी डाटा देत आहे. 193 रूपयांचा एडआॅन पॅक वेगळा यासाठी आहे कारण हा पॅक कोणत्याही प्लान च्या वॅलिडिटी मध्ये जोडला जातो.

लक्षात असू दे, जर एयरटेल कस्टमर ने कोणताही असा प्लान घेतला आहे जो 28 दिवसांच्या वॅलिडिटी सह येतो आणि रोज 1 जीबी डाटा देतो. त्या प्लान सोबत ग्राहकांनी जर 193 रुपयांचा एडआॅन पॅक घेतला तर त्यांना 28 दिवसांसाठी रोज 2जीबी डाटा मिळेल.

त्याचप्रमाणे कोणत्याही ग्राहकाने एयरटेल चा 509 रुपयांचा प्लान घेतला आहे जो 90 दिवसांसाठी 1.4जीबी डाटा प्रतिदिन देतो आणि या प्लान सोबत 193 रुपयांचा एडआॅन पॅक घेतल्यास कस्टमरला 90 दिवसांसाठी रोज 2.4जीबी 4जी डाटा मिळणे सुरू होईल.

जियो च्या एडआॅन पॅक बद्दल बोलायचे तर हे पॅक ठरलेल्या डाटा सह येतात तर एयरटेल चा एडआॅन पॅक आधी पासून चालू असलेल्या प्लान च्या हिशोबाने कस्टमर्सना भरपूर फायदे देतो. एयरटेल चा हा 198 रुपयांच्या एडआॅन पॅक कंपनी च्या 193 रुपये, 349 रुपये, 399 रुपये तसेच 448 रुपयांच्या प्लान सोबत चालेल.