Home बातम्या ब्लॅकबेरी ईवॉल्व झाला लॉन्च, यात आहे 6जीबी रॅम, 6-इंचाचा डिस्प्ले, डुअल कॅमेरा आणि 4,000एमएचएच बॅटरी, वनप्लस-सॅमसंग ला मिळेल टक्कर

ब्लॅकबेरी ईवॉल्व झाला लॉन्च, यात आहे 6जीबी रॅम, 6-इंचाचा डिस्प्ले, डुअल कॅमेरा आणि 4,000एमएचएच बॅटरी, वनप्लस-सॅमसंग ला मिळेल टक्कर

ब्लॅकबेरी ने गेल्या महिन्यात भारतीय बाजारात आपला शानदार स्मार्टफोन ब्लॅकबेरी की2 लॉन्च केला होता. हा फोन 31 जुलै पासून देशात सेल साठी उपलब्ध झाला आहे. तर आज पुन्हा ब्लॅकबेरी इंडियन मार्केट मध्ये आपले दोन दमदार फोन घेऊन आली आहे. ब्लॅकबेरी ने ईवॉल्व एक्स आणि ईवॉल्व दोन मॉडेल लॉन्च केले आहेत. ब्लॅकबेरी ईवॉल्व 24,990 रुपयांमध्ये आणला आहे तर ईवॉल्व एक्स 34,990 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे.

ब्लॅकबेरी ईवॉल्व एक्स
ब्लॅकबेरी चा हा फोन 18:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. फोन मध्ये 1080 x 2160 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 5.99-इंचाचा आईपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे जो 2.5डी कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्टेड आहे. हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित आहे जो 64बिट आॅक्टा-कोर प्रोसेसर सोबत क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट वर चालतो.

कंपनी ने या फोन मध्ये 6जीबी रॅम सोबत 64जीबी इंटरनल स्टोरेज दिली आहे. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता हा फोन डुअल रियर कॅमेरा ला सपोर्ट करतो. याच्या बॅक पॅनल वर डुअल टोन एलईडी फ्लॅश सह 12-मेगापिक्सल आणि 13-मेगापिक्सल चे दोन कॅमेरा सेंसर​ देण्यात आले आहेत तर सेल्फी साठी या फोन मध्ये 16-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे.

ब्लॅकबेरी ईवॉल्व एक्स च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे आणि हा फेस अनलॉक फीचर ला पण सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह हा फोन यूएसबी टाइप-सी आणि ओटीजी ला सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअप साठी या फोन मध्ये क्वालकॉम क्वीक चार्ज 3.0 सपोर्ट असलेली 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी वायरलेस टेक्नोलॉजी ने पण चार्ज करता येते.

ब्लॅकबेरी ईवॉल्व
ब्लॅकबेरी ईवॉल्व पण कंपनी कडून 18:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. हा फोन पण 1080 x 2160 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 5.99-इंचाच्या आईपीएस एलसीडी डिस्प्ले ला सपोर्ट करतो जो कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्टेड आहे. एंडरॉयड 8.1 ओरियो सोबत हा फोन वेरिएंट 64बिट 1.8गीगा​हर्ट्ज आॅक्टा-कोर प्रोसेसर तसेच क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 450 चिपसेट वर चालतो.

ब्लॅकबेरी ईवॉल्व मध्ये 4जीबी रॅम देण्यात आला आहे. फोन मध्ये 64जीबी इंटरनल स्टोरेज आहे जी ईवॉल्व एक्स प्रमाणे कार्ड ने वाढवता येईल. हा फोन पण डुअल रियर कॅमेरा ला सपोर्ट करतो. फोन च्या बॅक पॅनल वर डुअल टोन एलईडी फ्लॅश सोबत 13-मेगापिक्सल चे दोन कॅमेरा सेंसर​ देण्यात आले आहेत तर सेल्फी साठी फोन च्या फ्रंट पॅनल वर 16-मेगापिक्सल चा कॅमेरा सेंसर आहे.

ब्लॅकबेरी ईवॉल्व चे कनेक्टिविटी फीचर्स ईवॉल्व एक्स सारखेच आहेत. फेस अनलॉक, रियर फिंगरप्रिंट सेंसर, यूएसबी टाइप-सी आणि ओटीजी सपोर्ट सोबत फोन मध्ये क्वीक चार्ज 3.0 सपोर्ट वाली 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

ब्लॅकबेरी ब्रँड चे हे दोन्ही फोन भारतात ​आॅप्टिमस इंफ्राकॉम द्वारा सादर करण्यात आले आहेत. ब्लॅकबेरी ईवॉल्व एक्स ऑगस्ट च्या शेवटी शॉपिंग साइट अमेजॉन इंडिया वर एक्सक्लूसिव सेल साठी उपलब्ध होईल तसेच ब्लॅकबेरी ईवॉल्व ला कंपनी सप्टेंबर मध्ये सेल साठी बाजारात आणेल. ब्लॅकबेरी फोन वर रिलायंस जियो कडून मिळणार्‍या 3,950 रुपये कॅशबॅक आॅफर चा फायदा पण घेता येईल.