सरकारी टेलीकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने काही दिवसांपूर्वी आपल्या यूजर्ससाठी वॉइस कॉल वर कॅशबॅकची ऑफर सुरु केली होती. या ऑफर अंतर्गत यूजर्सना दार 5 मिनिटांच्या वॉइस कॉल वर 6 पैसे दिले जातील. आता हि ऑफर अजून सोप्पी करण्यासाठी कंपनीने कॅशबॅक मिळवण्यासाठी SMS सेवेची सुरवात केली आहे.
BSNL नुसार कॅशबॅकचा लाभ सोप्पा करण्यासाठी हि SMS सेवा सुरु करण्यात आली आहे. यामुळे कॅशबॅक बेनिफिट्स मिळवण्यासाठी यूजर्सना प्रोत्साहन मिळेल. या नवीन अपडेट नंतर कॅशबॅक मिळवण्यासाठी BSNL यूजर्सना “ACT 6 paisa” लिहून 9478053334 वर पाठवावे लागेल. याआधी यूजर्सना वॉयस कॉल करावा लागत होता. हि कॅशबॅक ऑफर BSNL वायरलाइन, ब्रॉडबॅंड आणि फाइबर-टू-होम (FTTH) सब्सक्राइबर्सना मिळेल. ऑफर 31 डिसेंबर पर्यंत वैध असेल.
अलीकडेच सरकारने BSNL आणि MTNL मर्ज करण्याची घोषणा केली होती. अनेक वर्षे तोट्यात असलेल्या या दोन्ही सरकारी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी हि खुशखबर आहे. कारण या कंपन्या सरकार बंद करणार आहे अश्या बातम्या येत होत्या त्यामुळे सरकारी कर्मचारी चिंतेत होते. पण आता हि बातमी आल्यामुळे आधीच्या बातम्या फक्त अफवा होत्या हे सिद्ध झाले आहे. त्याचबरोबर 4 जी स्पेक्ट्रम साठी जवळपास 4000 कोटींची बजेट मध्ये तरतूद केली जाईल. ते म्हणाले कि पुढल्या 4 वर्षांत 38000 कोटी रुपये गुंतवले जातील. तसेच 15 हजार कोटींचे बॉन्ड पण जारी केले जातील.
कंपनीने काही दिवसांपूर्वी 998 रुपयांचा एक डेटा स्पेशल टॅरिफ वाउचर लॉन्च केला होता. हा प्लान फक्त केरळ मध्ये उपलब्ध करवण्यात आला आहे. प्लान मध्ये मिळणारे बेनिफिट्स पाहता यूजर्सना रोज 2जीबी डेटा मिळत आहे. तसेच या प्लानची व्हॅलिडिटी 210 दिवस आहे. याचा अर्थ संपूर्ण वैधतेच्या काळात यूजर्सना एकूण 420जीबी डेटा मिळेल. प्लान सब्सक्राइब करणाऱ्या यूजर्सना सुरवातीच्या दोन महिन्यांसाठी पर्सनलाइज्ड रिंग बॅक टोन बेनिफिट पण मिळेल. बीएसएनएल चा हा प्लान डेटा एसटीवी आहे त्यामुळे यात फ्री कॉलिंग किंवा एसएमएस बेनिफिट नाहीत.
