Home बातम्या 3300GB डेटा सह BSNL ने आणला हा शानदार प्लान किंमत, फक्त 599 रुपये

3300GB डेटा सह BSNL ने आणला हा शानदार प्लान किंमत, फक्त 599 रुपये

सरकारी टेलीकॉम कंपनी BSNL अनेक दिवसांपासून आपल्या प्रीपेड युजर्ससाठी नवीन आणि शानदार प्लान्स सादर करत आहे. तसेच एकदा पुन्हा कंपनीने एक नवीन धमाकेदार प्लान सादर केला आहे. पण यावेळी कंपनीने सादर केलेला प्लान ब्रॉडबॅंड युजर्ससाठी आहे. 599 रुपयांमध्ये सादर केलेल्या प्लानच्या जीवावर कंपनी एयरटेल आणि जियोला आव्हान देण्याचा प्रयत्न करत आहे. BSNL च्या या ब्रॉडबॅंड प्लानचे नाव ‘Fiber Basic Plus’ ठेवण्यात आले आहे. चला जाणून घेऊया कि बीएसएनएलच्या या नवीन प्लान मध्ये काय खास आहे.

बीएसएनएलच्या या प्लान मध्ये मिळणारे लाभ पाहता यात तुम्हाला 60Mbps च्या स्पीड सह 3300जीबी डेटा दिला जाईल. कंपनीने हा प्लान अनलिमिटेड डेटा बेनिफिट म्हणून सादर केला आहे. तसेच डेटा लिमिट संपल्यावर पण युजर्सना 2Mbps स्पीड वर इंटरनेट मिळेल. या प्लान सोबतच युजर्सना कोणत्याही नेटवर्कसाठी 24 तासांचे अनलिमिटेड कॉलिंग बेनिफिट पण दिले जात आहेत.

काही दिवसांपूर्वी ट्रायच्या वेबसाइट वर 5 नोव्हेंबरला अपडेट केलेल्या गेलेल्या वॉयस क्वालिटीच्या आकडयांनुसार, बीएसएनएलला 3.4 / 5 फीडबॅक रेटिंग, रिलायंस जियो आणि वोडाफोन 3.3 ची रेटिंग आणि एयरटेलला 3.0 स्टार रेटिंग मिळाली आहे.

BSNL चा 199 रुपयांच्या पोस्टपेड प्लान

अलीकडेच कंपनीने हा पोस्टपेड प्लान सादर केला होता. यात ग्राहकांना 25 जीबी डेटा आणि 75 जीबी पर्यंतची डेटा रोलओवर सुविधा पण मिळेल. तसेच बीएसएनएल ते बीएसएनएल नेटवर्क वर कॉलिंग अनलिमिटेड असेल. दुसऱ्या नेटवर्कसाठी युजर्सना 300 मिनट्स दिले जातील. सोबत रोज 100 एसएमएस फ्री मिळतील.