Home बातम्या 80GB डेटा सह BSNL ने सादर केला हा दमदार प्लान, किंमत: 399 रुपये

80GB डेटा सह BSNL ने सादर केला हा दमदार प्लान, किंमत: 399 रुपये

भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने नवीन रिचार्ज वाउचर सादर केला आहे. या प्लानची किंमत 399 रुपये आहे जो 80 दिवसांच्या वैधते सह येतो. या प्लान मध्ये कॉलिंग आणि डेटाचा लाभ पण मिळतो. नवीन प्लान चेन्नई आणि तामिळनाडू सर्कल मध्ये सादर केला गेला आहे. 399 रुपयांचा रिचार्ज प्लान 15 ऑगस्ट पासून उपलब्ध होईल. नवीन रिचार्ज सह दूरसंचार ऑपरेटरने एक टॅरिफ वाउचर पण बंद केला आहे, ज्याची किंमत 1699 रुपये आहे.

BSNL चा 399 रुपयांचा प्लान

हा प्लान कंपनीने स्वातंत्र्यदिनानिमित्त लॉन्च केला आहे. BSNL च्या 399 रुपयांच्या प्लान मध्ये 80 दिवसांची वैधता मिळते. बीएसएनएल च्या प्लान मध्ये रोज 1 जीबी डेटा मिळतो. एकदा रोजची FUP मर्यादा संपली कि अनलिमिटेड डेटा 80kbps वेगाने वापरता येईल.

या प्लान मध्ये होम आणि नॅशनल रोमिंग (दिल्ली आणि मुंबईच्या एमटीएनएल नेटवर्क रोमिंग क्षेत्रासहित) मध्ये अमर्याद वॉयस कॉलची सुविधा पण मिळते. बीएसएनएल च्या या प्लान मध्ये वॉयस कॉलसाठी FUP मर्यादा 250 आउटगोइंग मिनिट्स (स्थानिक + STD + आउटगोइंग रोमिंग) मिनिट्स इतकी आहे. रोजची FUP मर्यादा संपल्यावर कॉलसाठी बेस प्लान टॅरिफच्या दराने शुल्क आकारले जाईल.

600 रुपयांच्या ब्रॉडबँड प्लानची वैधता वाढली

BSNL ने आपल्या यूजर्ससाठी प्रोमोशनल प्लानच्या स्वरूपात 600 रुपयांचा एक ब्रॉडबँड प्लान सादर केला होता जो 27 जुलै पर्यंत वैध होता. पण आता कंपनीने ग्राहकांसाठी या प्लानची वॅलिडिटी वाढवली आहे. बीएसएनएल यूजर आता येत्या 27 ऑक्टोबर पर्यंत या प्लानचा रिचार्ज करू शकतील.

प्लान मधील फायदे पाहता 600 रुपयांमध्ये यूजर्सना एकूण 300GB डेटा दिला जात आहे जो 40Mbps च्या स्पीडने वापरता येतो. 300जीबी संपल्यावर ग्राहक 2Mbps च्या स्पीडने इंटरनेट वापरू शकतात. तसेच प्लान मध्ये अनलिमिटेड नॅशनल वॉयस कॉलिंग पण फ्री मिळेल.