भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) अनेक दिवस आपल्या प्रसिद्ध प्लानच्या जीवावर खाजगी टेलीकॉम कंपन्यांना टक्कर देण्याचा प्रयत्न करत आहे. पुन्हा एकदा कंपनीने आपल्या दमदार प्लान मध्ये बदल करून यूजर्सना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे.
कंपनीने यावेळी 1,098 रुपयांच्या प्रीपेड प्लान मध्ये बदल केला आहे. हा प्लान सरकारी टेलीकॉम कंपनी बीएसएनएल च्या बेसिक प्रीपेड प्लान्स मधला एक होता. जो रिलायंस जियोच्या स्वस्त प्लान्सना टक्कर देण्यासाठी 84 दिवसांच्या वॅलिडिटी सह सादर केला गेला होता. आता या प्रीपेड प्लान मध्ये बदल केला गेला आहे.
कंपनीने या प्लान मध्ये बदल करत याची ओवरऑल डेटा लिमिट ठरवली आहे, सोबत प्लानची वॅलिडिटी पण 9 दिवसांनी कमी केली आहे. 1,098 रुपयांचा बीएसएनएलचा प्रीपेड प्लान आतापर्यंत यूजर्सना डेटा बेनिफिट्स व्यतिरिक्त वॉइस कॉलिंग आणि एसएमएस 84 दिवसांसाठी देत होता, आता हि वैधता कमी करून 75 दिवस करण्यात आली आहे.
आता या प्लानची वैधता 75 दिवस झाली आहे, यात यूजर्सना 375 जीबी डेटा मिळेल. याआधी हा प्लान 84 दिवसांसाठी यूजर्सना अनलिमिटेड डेटा वापरण्याचा ऑप्शन होता. डेटा बेनिफिट्स सोबत यूजर्सना या प्लान मध्ये अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि रोज 100 फ्री एसएमएस 75 दिवसांसाठी मिळतील. यूजर्स साठी या प्लान मध्ये कोणतीही डेली लिमिट सेट नाही.
विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी बीएसएनएल ने आपला 1,699 रुपयांचा प्लान सादर केला होता, ज्यात 365 दिवसांची वैधता दिली जात होती. अलीकडेच यात बदल करून 90 दिवसांची वैधता देण्याची घोषणा केली गेली होती. कंपनी हि प्रमोशनल ऑफर 14 ऑगस्ट 2019 पासून 13 सप्टेंबर 2019 पर्यंत चालू ठेवेल. जर तुम्ही अतिरिक्त वैधता मिळवू इच्छित असाल तर हा रिचार्ज या कालावधीत करा.
