Categories: बातम्या

521KM च्या अवाढव्य रेंजसह BYD Atto 3 Electric SUV ची भारतात एंट्री; युनिट्स संपण्याआधीच करा बुक

BYD Atto 3 electric SUV: BYD कंपनी गेली अनेक वर्ष भारतीय बाजारात आपले electric vehicles सादर करत आहे. अलीकडेच कंपनीनं E6 all-electric MPV सादर करून passenger vehicle business सेगमेंटमध्ये पाऊल टाकले होते. आता कंपनीनं आपली नवीन इलेक्ट्रिक कार लाँच करून Tata आणि MG ला टक्कर देण्याची पुरेपूर तयारी केली आहे. कंपनीनं भारतात BYD Atto 3 electric SUV सादर केली आहे जी प्रायव्हेट ग्राहकांसाठी आहे. या लेखात BYD Atto 3 electric SUV Range, Price, Specs आणि Booking Detail ची माहिती देण्यात आली आहे.

कंपनीनं लाँच केलेली या नवीन इलेक्ट्रिक कारची किंमत मात्र सांगितली नाही. प्राइसची माहिती पुढील महिन्यात दिली जाऊ शकते. रिपोर्ट्सनुसार ही कार 30 लाख रुपयांच्या प्राइस रेंजमध्ये येऊ शकते. भारतीय बाजारात हुंडई कोना EV, टाटा नेक्सन EV Max आणि MG ZS EV कडून या कारला टक्कर मिळेल. ही कार 50 हजार देऊन साइटवर बुकिंग करता येईल. हे देखील वाचा: सावधान! 5G अपग्रेडच्या नावाखाली होतेय फसवणूक, अशाप्रकारे करा स्वतःचा बचाव

BYD Atto 3 ची डिजाइन

BYD Atto 3 एक आकर्षक डिजाइनसह सादर करण्यात आली आहे. यात समोरच्या बाजूला एक जाडी क्रोम हॉरिजॉन्टल स्ट्रिप आहे जिच्या खाली एक एलईडी लाइट बार आहे, जी पुढे एलईडी डीआरएल पर्यंत पसरली आहे. एलईडी हेडलॅम्प पातळ आहेत, आणि टेल लॅम्प एक लाइटबारच्या माध्यमातून एकमेकाशी जोडले गेले आहेत. या कारमध्ये स्टाइलिश ड्युअल-टोन अलॉय व्हीलचा समावेश करण्यात आला आहे ज्यांचा आकार 18 इंच आहे. तसेच BYD नं व्हिज्युअल बल्क कमी करण्यासाठी बाहेर एयर वेंटचा वापर केला आहे. BYD Atto 3 ची साइज 4,445 मिमी लांब, 1,875 मिमी रुंद आणि 1,615 मिमी उंच आहे.

BYD Atto 3 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

BYD Atto 3 मध्ये वायरलेस फोन चार्जर, Android Auto, Apple CarPlay, 7 एयरबॅग, 360-डिग्री कॅमेरा, मल्टी-कलर एंबियंट लाइटिंग, अडॅप्टिव्ह क्रूज कंट्रोल, इमरजेंसी ब्रेकिंग, रियर कोलिजन अलर्ट, ब्लाइंडस्पॉट मॉनिटरिंग सारखे फीचर्स मिळतात.

तसेच या इलेक्ट्रिक कारमध्ये 60.48 kWh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 80 kW DC फास्ट चार्जिंगसह येते. कंपनीनं दावा केला आहे की कारची बॅटरी 0 ते 80 टक्क्यापर्यंत फक्त 50 मिनिटांत चार्ज होते. तसेच कारमध्ये Type 2 AC चार्जर आहे जो 10 तासांमध्ये कार फुल चार्ज करेल.

electric SUV मध्ये 3.3 kW लोडचा पावर बॅकअप मिळतो. तसेच BYD Atto 3 मध्ये 7 kW AC चार्जर आणि 3kW पोर्टेबल चार्जिंग बॉक्स मिळतो. इतकेच नव्हे तर ही कार एकदा चार्ज केल्यावर 521KM ची रेंज मिळते. हे देखील वाचा: Airtel 5G vs Jio 5G: निकाल आला समोर; कोणत्या कंपनीचं 5G आहे सर्वात फास्ट, जाणून घ्या

बॅटरीवर मिळेल वॉरंटी

BYD Atto 3 मध्ये 6 वर्ष/1.5 lakh km ची वॉरंटी मिळते. तसेच बॅटरी पॅकवर 8 वर्ष/1.60 lakh km ची वॉरंटी देण्यात आली आहे. प्रोमोशनल बेनिफिट्स पाहता यात 3 वर्षांचे 4G डेटा सब्सक्रिप्शन आणि 6 फ्री सर्व्हिस मिळतात.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

Published by
Ankit