Airtel 5G vs Jio 5G: निकाल आला समोर; कोणत्या कंपनीचं 5G आहे सर्वात फास्ट, जाणून घ्या

5G Speed:भारतीय टेलिकॉम कंपनी Reliance Jio आणि Airtel नं आपली 5जी सर्व्हिस (5G Service) लाँच केला आहे. जियोनं Jio 5G Welcome Offer (Jio True 5G) सह दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि वाराणसीमध्ये 5G सेवा लाँच केली आहे तर त्याआधी एयरटेलची Airtel 5G Plus सेवा देशातील आठ शहरांमध्ये पोहोचली आहे. त्यामुळे भारतीय ग्राहकांपुढे एयरटेल व जियो असे दोन पर्याय 5G साठी उपलब्ध झाले आहेत. यातील कोणाचं 5G बेस्ट आणि कोणाचा 5जी स्पीड (5G Speed) सर्वात जास्त याची माहिती आता Ookla च्या स्पीडटेस्ट इंटेलिजेंस रिपोर्टमधून समोर आली आहे. चला जाणून घेऊया या रिपोर्टमध्ये नेमका काय खुलासा झाला आहे.

809.94Mbps चा 5G डाउनलोड स्पीड

या रिपोर्टनुसार, भारतातील 5G सर्व्हिसमध्ये 809.94Mbps पर्यंतचा डाउनलोड स्पीड मिळत आहे. तसेच डेटामधून समजलं आहे की ऑपरेटर्स अजूनतरी नेटवर्क रीकॅलीब्रेट करत आहेत. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर चांगला स्पीड् मिळू शकतो. हे देखील वाचा: OnePlus च्या तोडीचा स्मार्टफोन येतोय भारतात; खिशाला परवडणाऱ्या किंमतीत POCO F5 येणार बाजारात

Ookla ने त्या चार शहरांमध्ये सरासरी 5G डाउनलोड स्पीडची तुलना की आहे, जिथे जियो आणि एयरटेल दोन्ही कंपन्यांनी 5जी नेटवर्क सुरु केलं आहे. सध्या या शहरांमध्ये जियो 5G बीटा ट्रायल, ज्याला कंपनी “Jio True 5G” म्हणत आहे, उपलब्ध आहे. तर, एयरटेलनं आपली Airtel 5G Plus सर्व्हिस सर्व युजर्ससाठी जारी केली आहे.

दिल्लीतील 5G स्पीड: Ookla च्या ‘स्पीडटेस्ट इंटेलिजेंस’ रिपोर्टनुसार, जूनपासून आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार राजधानी दिल्लीत एयरटेलचा सरासरी 5जी डाउनलोड स्पीड 197.98 एमबीपीएस होता. तर जियोच्या नेटवर्कवर सरासरी 5जी डाउनलोड स्पीड 598.58 एमबीपीएस नोंदवण्यात आला.

वारणसीमधील 5जी स्पीड: वाराणसी एकमेव असं शहर होतं जिथे जियो आणि एयरटेल दरम्यान 5जी स्पीडची चांगली स्पर्धा दिसली आणि यात Airtel विजयी ठरली. वाराणसीमध्ये जियोचा सरासरी डाउनलोड स्पीड 485.22 एमबीपीएस होता तर एयरटेलनं 516.57 एमबीपीएसचा सरासरी 5जी डाउनलोड स्पीड नोंदवला आहे.

मुंबईमधील 5जी स्पीड: मुंबई मध्ये जून 2022 पासून उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार जियोचा सरासरी डाउनलोड स्पीड 515.38 एमबीपीएस होता तर या तुलनेत एयरटेल फक्त 271.07 एमबीपीएस स्पीडमुळे मागे राहिली. हे देखील वाचा: Jio आणि Airtel चं साम्राज्य धोक्यात! Adani कंपनीला मिळालं टेलीकॉम सर्व्हिसचं लायसन्स

कोलकात्त्यातील 5जी स्पीड: 5जीच्या सरासरी डाउनलोड स्पीडमध्ये सर्वात अंतर कोलकातामध्ये दिसलं आहे. शहरात एयरटेलचा सरासरी डाउनलोड स्पीड 33.83 एमबीपीएस होता. तर दुसरीकडे जियोचा सरासरी डाउनलोड स्पीड सुमारे 14 गुना जास्त म्हणजे 482.02 एमबीपीएस नोंदवण्यात आला आहे.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here