5G Services in India आता सत्यात आली आहे, एयरटेल देशात सर्वप्रथम आठ शहरांमध्ये 5जी सेवा सुरु केली आहे. तर Jio नं भारतातील 4 शहरातील ग्राहकांना 5G Network चा अनुभव देण्यास सुरुवात केली आहे. मोबाइल युजर्स देखील या नवीन 5जी टेक्नॉलॉजी बद्दल खूप उत्सुक आहेत तसेच लोक आपल्या मोबाइल फोन्समध्ये 5जी वापरण्याची आतुरतेने वाट बघत आहेत. परंतु 5जी सर्व्हिस सुरु होताच भारतात 5G Fraud देखील समोर येऊ लागला आहे. 5G sim upgrade च्या नावाखाली लोकांची फसवणूक होत आहे आणि याबाबत एक चेतावणी सायबर पोलिसांनी देखील जारी केली आहे.
5G SIM Fraud ची बातमी गुरूग्राममधून समोर आली आहे जिथे सायबर पोलिसांनी लोकांना 5जीच्या नावावर होत असलेल्या फसवणुकीबाबत लोकांना जागरूक राहण्याचा सल्ला दिला आहे. 5जी सर्व्हिस लाँच होताच यासंबंधित फ्रॉड देखील समोर येऊ लागले आहेत. गुरूग्राम सायबर पोलीस सेलनं मोबाइल युजर्सना सायबर गुन्हेगारांपासून वाचण्याची चेतावणी देत म्हटलं आहे की काही फ्रॉड लोक 4G SIM ला 5G SIM Card वर अपग्रेड करण्याच्या नावाखाली सामान्य जनतेची फसवणूक करत आहेत. हे देखील वाचा: Airtel 5G vs Jio 5G: निकाल आला समोर; कोणत्या कंपनीचं 5G आहे सर्वात फास्ट, जाणून घ्या
5जीच्या नावाखाली फसवणूक
5जी सिम फ्रॉडबद्दल लोकांना जागृत केलं जात आहे. काही scammer 4जी सिम कार्ड 5जी सिमवर अपग्रेड करण्याच्या नावाखाली मोबाइल युजर्सना फसवत आहेत. काही ठिकाणी टेलीकॉलिंगच्या माध्यमातून लोकांना कॉल्स केले जात आहेत तसेच त्यांना त्यांचं सिम कार्ड 5जीवर अपग्रेड केलं जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. या अपग्रेडेशनसाठी त्या लोकांच्या मोबाइल फोन्सवर वन-टाइम पासवर्ड (OTP) पाठवला जात आहे जो सांगितल्यानंतर मोबाइल नंबरशी लिंक बँक अकांउटमधून पैसे डेबिट होत आहेत.
फोनमध्ये ओटीपीच्या माध्यमातून फ्रॉड करण्यासोबतच सायबर गुन्हेगार मोबाइल युजर्सना 5जी अपग्रेडची लिंक देखील पाठवत आहेत. या लिंक्सवर क्लिक करताच लोकंचे स्मार्टफोन्स हॅक केले जात आहेत. मोबाइल फोन हॅकिंगच्या माध्यमातून त्यातील कॉन्टेक्टस तसेच मेसेजचा अॅक्सेस या स्कॅमर्सना मिळतो ज्याच्या माध्यमातून बँक अकांउट डिटेल मिळवले जातात आणि त्यातील पैसे काढले जातात. हे देखील वाचा: OnePlus च्या तोडीचा स्मार्टफोन येतोय भारतात; खिशाला परवडणाऱ्या किंमतीत POCO F5 येणार बाजारात
5G upgrade चे हे सर्व ओटीपी, एसएमएस तसेच लिंक टेलीकॉम कंपन्यांच्या नावानं पाठवले जात आहेत आणि त्यामुळे मोबाइल युजरसाठी धोका वाढला आहे. यापासून बचाव करण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला मोबाइलवर आलेला ओटीपी न देण्याचा सल्ला दिला जात आहे. तसेच 5G अपग्रेडसाठी कोणत्याही लिंक क्लिक करण्याची गरज नाही. तुमच्या मोबाइलवर 5G वापरण्यासाठी सिम कार्ड अपग्रेड करण्याची गरज नाही असं कंपन्यांनी देखील सांगितलं आहे. जुनं 4G सिम 5G फोनमध्ये टाकून तुम्ही ज्या शहरांमध्ये 5G उपलब्ध झालं आहे तिथे ते वापरू शकता.
लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.