Home बातम्या रिलायंस जियो प्रत्येक महिन्याला विकत आहे 70 लाख जियोफोन : रिपोर्ट

रिलायंस जियो प्रत्येक महिन्याला विकत आहे 70 लाख जियोफोन : रिपोर्ट

काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की देशातील प्रसिध्द टेलीकॉम कंपनी रिलायंस जियो चा 4जी फीचर फोन जियोफोन ने सर्वांना मागे टाकत देशातील फीचर फोन बाजारात पाहिले स्थान मिळवले आहे. या रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले होते की एकट्या जियोफोन ने भारतीय फीचर फोन बाजाराच्या 35.8 टक्के शेयर वर कब्जा केला आहे. तसेच आता जियोफोन च्या बाबतीत एक आश्चर्यकारक रिपोर्ट समोर आला आहे. या रिपोर्ट नुसार जियो प्रत्येक महिन्याला 70 लाख जियोफोन विकत आहे.

रिलायंस जियो च्या 4जी फीचर फोन जियोफोन च्या बाबतीत हा आश्चर्यकारक रिपोर्ट रिसर्च कंपनी क्रेडिट स्विस ने सादर केला आहे. हा रिपोर्ट जानेवारी 2018 पासून मार्च 2018 दरम्यान केल्या गेलेल्या सर्वे चा आहे आणि या सर्वे मध्ये समोर आलेल्या आकड्यांनुसार रिलायंस जियो प्रत्येक महिन्याला जवळपास 70 लाख जियोफोन हँडसेट विकत आहे.

इंडियन टेलीकॉम सेक्टर वर झालेल्या सर्वे मध्ये सांगण्यात आले आहे की आता पर्यंत जियोफोन चे जवळपास 40 मिलियन म्हणजे 4 कोटी यूनिट्स विकले गेले आहेत. या 4 कोटी यूनिट्स मध्ये जवळपास 2 कोटी मोबाईल फोन साल 2018 च्या पहिल्या तिमाहीत म्हणजे जानेवारी पासून मार्च महिन्यांमध्ये विकले गेले आहे. या हिशोबाने प्रत्येक महिन्याला जियो ने 70 लाखाच्या आसपास जियोफोन संपूर्ण देशात विकले आहेत.

रिपोर्ट नुसार वर्षाच्या सुरवातीला रिलांयस जियो ने लॉन्च केलेला 49 रुपयांचा प्लान जियोफोन च्या सेल मध्ये खुप उपयोगी ठरला आहे. हा प्लान सादर केल्यानंतर जियोफोन ची मागणी खुप वाढली आहे आणि तीन महिन्यात कंपनी ने 2 लाख पेक्षा जास्त हँडसेट विकले आहेत.

जसे की आम्ही आधीच सांगितले आहे 2018 च्या पहिल्या तिमाहीत फीचर फोन मार्केट मध्ये 35.8 प्रतिशत हिस्सेदारी जियोफोन ची आहे. 9.8 टक्क्यां सह सॅमसंग नंबर दोन 9.4 टक्के हिस्सेदारी सह चीनी कंपनी आईटेल तिसर्‍या नंबर वर राहिली आहे