Home बातम्या शाओमीला मागे टाकत जियो बनली देशातील सर्वात मोठी मोबाईल कंपनी, ओपो-वीवो रेस मध्ये राहिले मागे

शाओमीला मागे टाकत जियो बनली देशातील सर्वात मोठी मोबाईल कंपनी, ओपो-वीवो रेस मध्ये राहिले मागे

इंडियन मोबाईल मार्केट संपूर्ण जगात सर्वात वेगाने मोठा होणार मार्केट आहे. अमेरिका व चीन सारख्या देशांना मागे टाकत भारतात मोबाईल बाजारात जोरदार वृद्धि दिसत आहे. साल 2017 पेक्षा साल 2018 मध्ये 10 टक्क्यांची वाढ दिसली आहे. विशेष म्हणजे जगातील इतर देशांतील बाजारांत मोबाईल शिपमेंट मध्ये घसरण झाली आहे. देशात स्मार्टफोनचा बाजार वाढला आहे तसेच जियो ने पण आपल्या प्रोडक्ट्सच्या जोरावर संपूर्ण जगात नाव केले आहे. जियो ने या रेस मध्ये शाओमीचा रंग पण फीका केला आहे. खाली वाचा आमचा सविस्तर रिपोर्ट:

भारतातील मोबाईल बाजारातील प्रसिद्ध रिसर्च फर्म काउंटरप्वाइंट ने नवीन आकडे सादर केले आहेत, ज्यात 2018 च्या चौथ्या तिमाहीत टेक कंपन्या व स्मार्टफोन ब्रॅण्ड्सचा ​सेल आणि शिपमेंटची माहिती दिली आहे. या रिपोर्टनुसार रिलायंस जियो ने देशातील मोबाईल बाजारात सर्वात जास्त ग्रोथ केली आहे. वर्ष 2017 मध्ये फीचर फोन बाजारात जियोचा 11 टक्के शेयर होता. पण वर्षात जियो ने 27 टक्क्यांची वृद्धि करत फीचर फोन बाजारात 38 टक्के हिस्स्यावर कब्जा केला आहे.

जियो यावर्षी वेगाने प्रगती करत शाओमी व सॅमसंगला मागे टाकेल आहे. जियो ने 27 टक्क्यांची झेप घेतली आहे तर शाओमी 9 टक्क्यांची वाढ बघितली आहे. स्मार्टफोन बाजाराबद्दल बोलायचे तर या लिस्ट मध्ये शाओमीचा नंबर सर्वात वर आहे. शाओमी ने सर्वात जास्त 28 प्रतिशत मार्केट शेयर वर कब्जा केला आहे. शाओमी ने साल 2017 मध्ये 19 प्रतिशत शेयर मिळवला होता तर वर्ष 2018 मध्ये हा आकडा वाढून 28 टक्के झाला आहे.

शाओमी नंतर सॅमसंग या यादीत दुसऱ्या नंबर वर आहे. सॅमसंग ने वर्षभरात 24 टक्के बाजार शेयर् आपल्या नवे केला आहे. सॅमसंग नंतर इतर कंपन्यांमध्ये मोठे अंतर दिसले आहे. या लिस्टनुसार वीवो ने 10 टक्के शेयर मिळवला आहे तर ओपो ने 8 प्रतिशत मार्केट शेयर मिळवला आहें. या यादीत इंडियन स्मार्टफोन ब्रँड माइक्रोमॅक्सचे नाव पण आहे. माइक्रोमॅक्स ने साल 2018 मध्ये 5 टक्के बाजारावर कब्जा केला आहे.

फीचर फोन मार्केट पाहता ​जियो 38 टक्के मार्केट शेयर्स सह पहिल्या नंबर वर आहे. विशेष म्हणजे जियो ने फक्त दोन फीचर फोन बाजारात आणले आहेत ज्यात जियोफोन आणि जियोफोन 2 चा समावेश आहे. फक्त 2 फीचर फोनच्या जोरावर इतके मोठे यश जियोला इतरांपेक्षा वेगळं बनवतं. रिपोर्टनुसार जियो नंतर 12 टक्के शेयर्स सह सॅमसंग दुसऱ्या तसेच 8 प्रतिशत शेयर्ससह आईटेल तिसऱ्या नंबर वर आहे.

विशेष म्हणजे फीचर फोन बाजारात सॅमसंगची घसरण झाली आहे. वर्ष 2017 मध्ये सॅमसंगचा 21 टक्के फीचर फोन बाजारावर कब्जा होता पण वर्ष 2018 मध्ये फक्त 12 टक्के राहिला आहे. तसेच नोकिया ब्रँडचे फोन बनवणारी एचएमडी ग्लोबल कंपनी 7 टक्क्यांसह चौथ्या नंबर वर आहे. नोकियाला टक्कर देत लावा ने पण 7 टक्के फीचर फोन बाजारावर आपला कब्जा केला आहे.