Home बातम्या एक्सक्लूसिव: आम्ही घेऊन आलो आहोत एलजी जी8 चा 360 वीडियो आणि इमेज, बघा हा स्टाइलिश फोन

एक्सक्लूसिव: आम्ही घेऊन आलो आहोत एलजी जी8 चा 360 वीडियो आणि इमेज, बघा हा स्टाइलिश फोन

एलजी लवकरच आपला वी40 थिंकक्यू स्मार्टफोन भारतात लॉन्च करण्यास तयार आहे, जो कंपनी अमेझॉन इंडिया वर एक्सक्लूसिव सेल साठी 20 जानेवारीला सादर करेल. दरम्यान साउथ कोरियन कंपनीच्या अपकमिंग फ्लॅगशिप डिवाइस बद्दल माहिती समोर येत आहे. कंपनी एलजी जी8 अपकमिंग मोबाईल वर्ल्ड कांग्रेस (एमडब्लूसी) 2019 मध्ये सादर करू शकते जो बार्सिलोना मध्ये आयोजित होईल. हा डिवाइस कंपनी द्वारा गेल्यावर्षी सादर केलेल्या जी7 प्लस थिंकक्यू स्मार्टफोनचा अपग्रेडेड वर्जन असेल.

आता 91मोबाईल्स ने ऑनलीक्स डोबत भागेदारी करून एलजी जी8 चा एक्सक्लूसिव वीडियो आणि फोटो शेअर केले आहेत. या फोटो आणि वीडियो वरून तुम्ही स्मार्टफोनच्या डिजाइनचा अंदाज लावू शकता.

फोटोनुसार एलजी जी8 ची डिजाइन जुन्या वर्जन पेक्षा जास्त वेगळी नसेल. यात पण तुम्हाला ग्लास-सँडविच डिजाइन दिसेल. नीट बघितले तर समजले कि यावेळी कॅमेरा मॉड्यूल मागे हॉरिजोंटल प्लेस्डअसेल. यावेळी यात लेजर ऑटोफोक्स असेल. तसेच मागे फिंगरप्रिंट स्कॅनर असेल.

कॅमेरा बद्दल बोलायचे तर एलजी जी8 मध्ये डुअल कॅमेरा असेल. सध्या इतर कंपन्या आपल्या स्मार्टफोन मध्ये ट्रिपल कॅमेरा देत असताना हे जरा धक्कादायक वाटते. आशा आहे कि या स्मार्टफोन मध्ये 6.1-इंच डिस्प्ले असेल जो नॉच सह येईल. तसेच याचा आस्पेक्ट रेश्यो 19.5:9 असेल.

आपण फोटो मध्ये यूएसबी टाइप-सी पोर्ट, लाउडस्पीकर ग्रिल आणि 3.5एमएम ऑडियो सॉकेट बॉटमला बघू शकता. तसेच उजवीकडे पावर बटण आणि सिम ट्रे आहे. तसेच डावीकडे वॉल्यूम बटण सह गूगल असिस्टेंट बटण असेल. सोबत डावीकडे एक होल असेल जो वॉल्यूम बटणच्या वर असेल.

एलजी जी8 चे संभावित स्पेससिफिकेशन्स
एलजी जी8 बद्दल अनेक दिवसांपासून माहिती येत आहे. लीक्सनुसार स्मार्टफोन 5जी सेल्यूलर कनेक्टिविटी सह सादर केला जाऊ शकतो. तसेच एका लीक मध्ये समोर आले होते कि यात साउंड ऑन डिस्प्ले स्पीकर्स असतील. ऑनलीक्स ने हे कंफर्म पण केले आहे. जी8 मध्ये क्वॉलकॉमचा फ्लॅगशिप स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट असेल. पण हा डिवाइस एमडब्लूसी 2019 मध्ये सादर केलं जाईल कि नाही ते स्पष्ट नाही.