मोटोरोलाच्या जी7 सीरीजच्या अपकमिंग स्मार्टफोन्स संबंधित अनेक लीक्स समोर आले आहेत. अलीकडेच मोटोरोला ने मीडिया इनवाइट पाठवून स्पष्ट केले आहे कि मोटोरोला पुढील महिन्यात ब्राजील मध्ये एका ईवेंटचे आयोजन करत आहे, ज्यात मोटो जी7 सीरीज सादर केली जाऊ शकते.
मोटोरोलाच्या या सीरीज मध्ये मोटो जी7, मोटो जी7 प्ले, मोटो जी7 प्लस आणि मोटो जी7 पावर स्मार्टफोन असतील. तसेच बोलले जात आहे कि ब्राजील मध्ये प्रदर्शित झाल्यानंतर हे स्मार्टफोन भारतात पण येतील. आता 91 मोबाईल्सला आपल्या एका विश्वसनीय सूत्राकडून मोटो जी7 ची लाइव इमेज मिळाली आहे. या फोटो वरून स्मार्टफोनची डिजाइन दिसत आहे.
लाइव इमेज मध्ये आपण बघू शकतो कि मोटो जी7 दोन रंगांत म्हणजे ब्लॅक आणि रेड मध्ये लॉन्च होऊ शकतो. पण लॉन्चच्या वेळी कंपनी डिवाइस अजून अनेक रंगात अनु शकते. हँडसेट मध्ये वॉटर ड्रॉप स्टाइल नॉच दिसत आहे जी मोटोच्या स्मार्टफोन मध्ये पहिल्यांदा दिली जाईल. तसेच खालच्या बाजूला बेजल थोडे जाड आहेत.
बॅक पॅनल पाहता याच्या बाजूला 3डी कर्व्ड डिजाइन आणि सर्कुलर कॅमेरा मॉड्यूल दोन सेंसर व डुअल एलईडी फ्लॅश सह आहेत. फिंगरप्रिंट सेंसर मोटोरोलाच्या लोगो मध्ये असेल. एकंदरीत डिजाइन काहीवेळा पूर्वी आलेल्या रेंडर प्रमाणे वाटत आहे.
मोटो जी7 चे स्पेसिफिकेशन्स पाहता अलीकडेच आलेल्या लीक नुसार डिवाइस स्नॅपड्रॅगॉन 660 एसओसी सह सादर केला जाईल. तसेच मोटो जी7 प्लस मॉडेल पण स्नॅपड्रॅगॉन 660 एसओसी सह सादर केला जाऊ शकतो. तसेच या सीरीज मध्ये येणारे प्ले आणि पावर वेरिएंट स्नॅपड्रॅगॉन 625 चिपसेट सह सादर केले जाऊ शकतात.
