मागच्या काही महिन्यांत मोटो च्या नव्या एंडरॉयड फोन बद्दल खुप लीक्स आले आहेत. त्याचबरोबर काल हि बातमी पण आली आहे की कंपनी सप्टेंबर मध्ये एक इवेंट करणार आहे आणि यादिवशी तिन मोठे डिवाइस लॉन्च होऊ शकतात. त्यामुळे बोलले जात आहे की कंपनी यादिवशी मोटो वन मॉडल सादर करू शकते. पण फोन लॉन्च होण्याआधीच 91मोबाईल्सला मोटोरोला च्या या बहुप्रतिक्षित फोन बद्दल विशेष माहिती मिळाली आहे. 91मोबाइल्सला या फोन चे एक्सक्लूसिव लाइव फोटो मिळाले आहेत ज्यावरून तुम्हाला फोन बद्दल माहिती मिळू शकते.
फोटो मध्ये स्पष्ट पणे बघू शकता की हा एक बेजल लेस डिस्प्ले वाला फोन आहे. पण यात नॉच डिस्प्ले नाही. तसेच फोन चा बॅक पॅनल ग्लास डिजाइन मध्ये खुप चमकदार आहे. विशेष म्हणजे फोन मधील डुअल कॅमेरा बघू शकता. कंपनी ने मागच्या पॅनल वर वर्टिकल स्टाइल डुअल कॅमेरा दिला आहे. दोन्ही कॅमेरा च्या मध्ये फ्लॅश देण्यात आला आहे. त्याचबरोबर बॉडी च्या मधोमध मोटो चा लोगो आहे.
फ्रंट पॅनल पाहता यावर वरच्या बाजूला ईयरपीस सोबत फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच खालच्या पॅनल वर तुम्हाला मोटोरोला चे नाव दिसत आहे. अजूनही स्पेसिफिकेशन बद्दल जास्त माहिती मिळाली नाही पण या फोन चे अनेक लीक आले आहेत. ज्यानुसार मोटोरोला मोटो वन मध्ये तुम्हाला 6.2 इंचाची फुल एचडी+ स्क्रीन मिळेल. कंपनी याला 2280×1080 पिक्सल सह सादर करू शकते.
तसेच लीक नुसार मोटो चा हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 636 चिपसेट सह सादर केला जाऊ शकतो आणि फोन मध्ये 4जीबी रॅम मेमरी असू शकते. त्याचबरोबर कंपनी याला 64जीबी इंटरनल मेमरी सह सादर करू शकते. फोन मध्ये मेमरी कार्ड ला सपोर्ट असेल की नाही याबद्दल आता काहीच बोलता येत नाही. पण कॅमेरा बद्दल माहिती मिळाली आहे ज्यानुसार मोटोरोला मोटो वन 12एमपी+5एमपी डुअल रियर कॅमेरा सह सादर केला जाऊ शकतो. फोन मध्ये एफ/1.8 आणि एफ/2.0 अपर्चर वाला सेंसर दिला जाऊ शकतो. तसेच फ्रंट कॅमेरा 8एमपी चा असू शकतो. बॅटरी बॅकअप पाहता या फोन मध्ये तुम्हाला 3,780 एमएएच ची बॅटरी मिळू शकते.
