Home बातम्या एक्सक्लूसिव : शाओमीचा मास्टर स्ट्रोक आहे तयार, येत आहेत 65-इंचाचे दोन स्मार्ट टीवी 5ए आणि 5एस

एक्सक्लूसिव : शाओमीचा मास्टर स्ट्रोक आहे तयार, येत आहेत 65-इंचाचे दोन स्मार्ट टीवी 5ए आणि 5एस

चीनची ऍप्पल म्हणून ओळखली जाणारी टेक कंपनी शाओमी ने थोड्याच काळात भारतीय बाजारात चांगलीच फॅन फॉलोइंग बनवली आहे. भारतासहित अनेक देशांमध्ये शाओमी वेगाने मोठी झाली आहे. शाओमी स्मार्टफोन्स सोबतच स्मार्ट टीवी व अन्य गॅजेट्स पण टेक प्रेमींना आवडतात. शाओमी स्मार्ट टीवी ची मागणी भारतीय बाजारात पण खूप जास्त आहे.​ वेगवगेळ्या प्राइज रेंज मध्ये स्मार्ट टीवी सादर करणारी शाओमी आता अजून एक मास्टर स्ट्रोक मारणार आहे. 91मोबाईल्सला महत्वाची माहिती मिळाली आहे कि शाओमी अजून दोन नवीन स्मार्ट टीवी वर काम करत आहे जे लवकरच बाजारात येतील.

शाओमी अजून दोन शानदार स्मार्ट टीवींची निर्मिती करत आहे आणि लवकरच दोन्ही स्मार्ट टीवी टेक मंचावर सादर केले जातील. शाओमीच्या या स्मार्ट टेलीविजनची नावे शाओमी मी टीवी 5ए आणि शाओमी मी टीवी 5एस असतील. शाओमीचे हे दोन्ही स्मार्ट टेलीविजन चीनी वेबसाइट 3सी वर दिसले आहेत. या वेबसाइट वर हे दोन नवीन स्मार्ट टीवी मॉडेल नंबर आणि वॉल्ट पावर सह लिस्ट केले गेले आहेत. एक स्मार्ट टीवीचा मॉडेल नंबर एल65एम5-5ए आहे तर दुसरा एल65एम5-5एस मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला आहे.

मॉडेल नंबर बघून समजते कि शाओमीचे हे दोन्ही स्मार्ट टीवी मोठ्या स्क्रीन सह येतील आणि कंपनी हे 65-इंचाच्या मोठ्या डिस्प्ले सह लॉन्च करेल. लिस्टिंग मध्ये समजले आहे कि शाओमी मी टीवी 5ए आणि मी टीवी 5एस 220वॉल्ट पर्यंतच्या क्षमतेसह येतील. 3सी च्या लिस्टिंग मध्ये दोन्ही स्मार्ट टीवी संबंधित जास्त माहिती देण्यात आलेली नाही पण या लिस्टिंग वरून स्पष्ट झाले आहे कि शाओमी लवकरच दोन्ही नवीन स्मार्ट टीवी टेक मंचावर सादर करेल.

विशेष म्हणजे शाओमी ने भारतीय फॅन्सना नवीन वर्षाची भेट देत मी टीवी च्य किंमती 2,000 रुपयांपर्यंत कमी केल्या आहेत. शाओमी ने मी एलईडी स्मार्ट टीवी 4ए 32-इंच, मी एलईडी टीवी 4सी प्रो 32-इंच आणि मी एलईडी टीवी 4ए प्रो 49-इंचाच्या किंमती 2,000 रुपयांपर्यंत कमी केल्या आहेत. 32-इंचाच्या मी एलईडी स्मार्ट टीवी 4ए ची आधी एमआरपी 15,999 रुपये होती, पण आता या टेलिविजनची नवीन एमआरपी 14,499 रुपये असेल.

अशाचप्रकारे मी.कॉम वर हा टीवी 13,999 रुपयांमध्ये मिळत होता, कमी झालेल्या किंमती नंतर हा 12,499 रुपयांमध्ये मिळेल. तसेच, 32-इंचाच्या मी एलईडी टीवी 4सी प्रो ची करंट एमआरपी 16,999 रुपये होती. पण मूल्य कमी झाल्यानंतर नवीन एमआरपी 14,999 रुपये असेल. तर मी.कॉम वर हा टीवी आतापर्यंत 15,999 रुपयांमध्ये मिळत होता. आता मी.कॉम वर हा टीवी 13,999 रुपयांमध्ये मिळेल. शाओमीचा 49-इंचाचा मी एलईडी टीवी 4ए प्रो आता 30,999 रुपयांमध्ये मिळेल.