Motorola One Action बद्दल काही दिवसांपूर्वी एक बातमी समोर आली होती ज्यात फोनच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली होती. हा स्मार्टफोन अमेझॉन जर्मनी मध्ये दिसला होता ज्यातून Motorola One Action च्या किंमतीचा खुलासा पण झाला होता. आज मोटोरोला ‘वन सीरीज’ चा अजून एक स्मार्टफोन Motorola One Zoom आम्ही तुमच्यासमोर घेऊन आलो आहोत. फोन अधिकृत होण्याआधी आम्हाला Motorola One Zoom च्या स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली आहे.
91मोबाईल्सला सूत्रांकडून Motorola One Zoom ची माहिती मिळाली आहे. मोटोरोला वन झूमचा लुक व डिजाईन आधीच समोर आली होती तसेच याच्या स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीचा पण खुलासा झाला आहे. सर्वात आधी फोनच्या किंमतीबद्दल बोलायचे तर Motorola One Zoom कंपनी द्वारा 429 यूरो च्या आसपास लॉन्च केला जाईल. हि किंमत इंडियन करंसीनुसार 34,000 रुपयांच्या आसपास आहे. Motorola One Zoom पुढल्या महिन्यात IFA 2019 च्या मंचावरून लॉन्च केला जाईल.
Motorola One Zoom डिजाईन
मोटोरोलाचा हा फोन कंपनीच्या आधीच्या स्मार्टफोन्स पेक्षा वेगळा असेल. फोनच्या रियर पॅनल वर चौकोनी आकाराचा कॅमेरा सेटअप दिला जाईल. लीक झालेल्या फोटो मध्ये कॅमेरा सेटअप मध्ये चार कॅमेरा सेंसर दिसत आहेत. कॅमेरा सेटअप मधेच सेंसर्सच्या खाली Motorola चा लोगो आहे. कॅमेरा सेटअपच्या उजवीकडे एलईडी फ्लॅश देण्यात आली आहे. Motorola One Zoom बेजल लेस नॉच डिस्प्ले वर बनवण्यात आला आहे तसेच डिस्प्लेच्या वर ‘यू’ शेप नॉच देण्यात आली आहे.या फोन मध्ये 3.5एमएम जॅक आणि यूएसबी टाईप सी पोर्ट पण मिळेल.
Motorola One Zoom स्पेसिफिकेशन्स
आम्हाला मिळालेल्या एक्सक्लूसिव माहितीनुसार Motorola One Zoom मध्ये 1,080 x 2,340 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.2-इंचाचा मोठा डिस्प्ले दिला जाईल जो एचडीआरला सपोर्ट करेल. सूत्रांनुसार मोटोरोला वन झूम एंडरॉयड 9 पाई आधारित वन ओएस वर सादर केला जाईल, त्याचबरोबर हा स्मार्टफोन क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 600 सीरीजच्या सर्वात पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 675 वर चालेल.
Motorola One Zoom दोन रॅम वेरिएंट्स मध्ये बाजारात येईल. या वेरिएंट्स मध्ये 6जीबी रॅम आणि 4जीबी रॅम मिळेल तर स्टोरेज ऑप्शन्स म्हणून मोटोरोलाचा हा फोन 64जीबी इंटरनल मेमरी आणि 128जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करेल. सूत्रांनुसार Motorola One Zoom कंपनी द्वारा 4,000एमएएच च्या पावरफुल बॅटरी वर लॉन्च केला जाईल. हा फोन एनएफसी ला सपोर्ट करेल तसेच बाजारात ग्रे आणि पर्पल कलर वेरिएंट मध्ये लॉन्च केला जाईल.
कॅमेरा सेग्मेंट
Motorola One Zoom च्या कॅमेरा सेग्मेंटची बातमी अजूनतरी पूर्णपणे हाती आली नाही. पण लीक्स नुसार हा फोन क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. फोन मध्ये 48-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर दिला जाईल. त्याचबरोबर मोटोरोला वन झूम 12-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा आणि 8-मेगापिक्सलच्या तिसऱ्या कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. लीक मध्ये Motorola One Zoom च्या चौथ्या कॅमेरा सेंसरची माहिती समोर आली नाही. तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो.
लीक्स नुसार Motorola One Zoom चा रियर कॅमेरा सेटअप dual OIS च्या क्षमतेचा असेल. हा कॅमेरा सेटअप 1.6-micron pixel size ला सपोर्ट करेल तसेच याची फोकल लेंथ 13mm पासून 81mm पर्यंत असेल. बोलले जात आहे कि Motorola One Zoom 5x hybrid zoom च्या क्षमतेसह येईल. फोनचे संपूर्ण स्पेसिफिकेशन्स लवकरच येतील.
वीडियो
