Home बातम्या Exclusive : जानेवारी मध्ये भारतात लॉन्च होईल पॉप-अप कॅमेरा असलेला OPPO F15, लुक असेल वेगळा

Exclusive : जानेवारी मध्ये भारतात लॉन्च होईल पॉप-अप कॅमेरा असलेला OPPO F15, लुक असेल वेगळा

OPPO ने भारतात आपल्या ‘एफ सीरीज’ च्या जीवावर चांगली फॅन फॉलोइंग बनवली आहे. मीड रेंजच्या या सीरीजचे स्मार्टफोन फक्त लुक आणि डिजाईनच्या बाबतीती शानदार नव्हते तर स्पेसिफिकेशन्सच्या बाबतीत पण हे स्मार्टफोन्स खूप ताकदवान होते. ओपोच्या या सीरीज मध्ये येणारा शेवटचे स्मार्टफोन्स OPPO F11 आणि OPPO F11 Pro होते. हे दोन्ही स्मार्टफोन बाजारात झाले होते. पण त्यानंतर बातम्या येऊ लागल्या होत्या कि ओपो आपली एफ सीरीज बंद करत आहे. आज 91मोबाईल्सला एक्सक्लूसिव बातमी मिळाली आहे कि OPPO आपल्या एफ सीरीजच्या नवीन डिवाईस वर काम करत आहे आणि या सीरीज मध्ये लवकरच नवीन स्मार्टफोन OPPO F15 नावाने लॉन्च होणार आहे.

91मोबाईल्सला ओपोची एक टीजर ईमेज मिळाली आहे ज्यात कंपनीच्या आगामी स्मार्टफोनचा खुलासा झाला आहे. तसेच सूत्रांकडून माहिती मिळाली आहे कि ओपो कंपनीच्या एफ सीरीजच्या आगामी स्मार्टफोन वर काम करत आहे आणि या आगामी डिवाईसचे नाव OPPO F15 असेल. प्राप्त माहितीनुसार OPPO F15 कंपनी द्वारा जानेवारी मध्ये लॉन्च केला जाईल. विशेष म्हणजे आम्हाला मिळालेल्या फोटो मध्ये स्पष्ट लिहिण्यात आले आहे कि, The Next OPPO F Series Is Coming.

OPPO F15

ओपो एफ15 च्या फोटोवरून फोनच्या डिजाईनची माहिती पण मिळाली आहे. हा फोन बेजल लेस डिस्प्ले सह लॉन्च केला जाईल. OPPO F15 मध्ये ‘यू’ शेप वॉटरड्रॉप नॉच असेल. आशा आहे कि OPPO F15 Pro मध्ये पॉप अप कॅमेरा मिळेल. ओपो एफ सीरीजच्या शेवटच्या स्मार्टफोन मध्ये पण पॉप अप कॅमेरा देण्यात आला होता. फोटो मध्ये OPPO F15 च्या डाव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर देण्यात आला आहे तसेच उजव्या पॅनल वर सिम स्लॉट सह पावर बटण आहे. आशा आहे कि हा पावर बटण फिंगरप्रिंट सेंसर इम्बेडेड असू शकतो. महत्वाचे म्हणजे OPPO F15 कंपनी Reno सीरीज सारख्या डिजाईनसह अनु शकते. म्हणजे फोनचा रियर पॅनल OPPO Reno फोन सारखा असेल. OPPO F15 मध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप मिळेल जो बॅक पॅनल वर डावीकडे वरच्या बाजूला असेल.

Oppo F11

Oppo F11 कंपनी ने 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला आहे. हा फोन 2340 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.5-इंचाच्या फुलएचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा फोन ओपो ने एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 9 पाई आधारित कलर ओएस 6.0 वर सादर केला आहे जो आक्टा-कोर प्रोसेसर सह 12एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या मीडियाटेक हेलीयो पी70 चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्स साठी या फोन मध्ये माली जी72 एमपी3 जीपीयू देण्यात आला आहे.

फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 48-मेगापिक्सलचा 6पी लेंस प्राइमरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे जो एफ/1.79 अपर्चरला सपोर्ट करतो. तसेच बॅक पॅनल वर 5-मेगापिक्सलचा सेकेंडी कॅमेरा सेंसर आहे. Oppo F11 चा रियर कॅमेरा सेटअप लो लाईट फोटोग्राफीचे शानदार रिजल्ट देण्याचा दावा करतो. तसेच सेल्फी साठी हा फोन 16-मेगापिक्सलच्या पॉप-अप सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Oppo F11 इंडिया मध्ये 4जीबी रॅम वर सादर केला गेला आहे. हा फोन 128जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो जी माइक्रोएसडी कार्डने 256जीबी पर्यंत वाढवता येतो. Oppo F11 डुअल सिम फोन आहे जो 4जी एलटीई सह बेसिक कनेक्टिविटी फीचर्सला सपोर्ट करतो. सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअप साठी हा फोन वीओओसी फ्लॅश चार्ज 3.0 टेक्नॉलॉजी असलेल्या 4,020एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो.