Home बातम्या एक्सक्लूसिव : लॉन्चच्या आधीच बघा Vivo Y15 चे फुल स्पेसिफिकेशन्स आणि किंमत

एक्सक्लूसिव : लॉन्चच्या आधीच बघा Vivo Y15 चे फुल स्पेसिफिकेशन्स आणि किंमत

91मोबाईल्सने Vivo Y सीरीज मध्ये लॉन्च होणाऱ्या आगामी स्मार्टफोन Vivo Y15 बद्दल आधीपण एक्सक्लूसिव माहिती दिली आहे. आम्हीच सर्वात आधी सांगितले होते कि वीवो भारतात आपली वी सीरीज वाढवत दोन नवीन स्मार्टफोन Vivo Y15 आणि Vivo Y12 लॉन्च करेल. आमच्या रिपोर्ट मध्ये आम्ही या दोन्ही स्मार्टफोन्सच्या फीचर्स आणि किंमतीची माहिती पण दिली आहे. कंपनीने अजूनही आपल्या आगामी स्मार्टफोनची लॉन्च डेट सांगितलेली नाही, पण फोन बाजारात येण्याआधीच आज आम्ही Vivo Y15 चा फोटो आणि याचे फुल स्पेसिफिकेशन्स घेऊन आलो आहोत.

लुक व डिजाईन
सर्वात आधी Vivo Y15 च्या लुक बद्दल बोलायचे तर हा स्मार्टफोन ट्रेंड मधील वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले वरच लॉन्च केला जाईल. डिस्प्लेच्या वर ‘वी’ शेप नॉच दिली जाईल आणि याच नॉच मध्ये सेल्फी कॅमेरा असेल. Vivo Y15 चे तिन्ही कडा बेजल लेस असतील तर खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट दिला जाईल. Vivo चा हा आगामी स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल.

फोनच्या बॅक पॅनल वर वर्टिकल शेप मध्ये तीन कॅमेरा सेंसर दिले जातील जे डावीकडे असतील. या कॅमेरा सेटअपच्या खाली एलईडी फ्लॅश पण दिली जाईल. Vivo Y15 च्या बॅक पॅनल वरच फिजिकल फिंगरप्रिंट सेंसर असेल. वॉल्यूम रॉकर आणि पावर बटण फोनच्या उजवीकडील पॅनल वर असतील फोनच्या डाव्या पॅनल वर सिम ट्रे दिली जाईल. तसेच Vivo Y15 च्या खालच्या पॅनल वर यूएसबी पोर्ट आणि स्पीकर असतील.

शानदार कॅमेरा
फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Vivo Y15 ट्रिपर रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/2.2 अपर्चर वाला 13-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर दिला जाईल. वीवोचा हा फोन इतक्याच अपर्चर असलेल्या 8-मेगापिक्सलच्या सेकेंडरी आणि एफ/2.4 अपर्चर वाला 8-मेगापिक्सलच्या दुसऱ्या सेंसरला सपोर्ट करेल. त्याचबरोबर सेल्फी साठी Vivo Y15 मध्ये एफ/2.0 अपर्चर वाला 16-मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा मिळेल.

स्पेसिफिकेशन्स
Vivo Y15 कंपनी द्वारा 19.3:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला जाईल तसेच फोनचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 89 टक्के असेल. हा फोन 720 X 1544 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.35-इंचाच्या एचडी+ एलसीडी डिस्प्लेला सपोर्ट करेल ज्याच्या प्रोटेक्शन साठी ग्लास कोटिंग केली जाईल. कंपनी Vivo Y15 एंडरॉयड 9.0 आधारित फनटच ओएस 9 वर सादर करेल जो आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेक हेलीयो पी22 चिपसेट वर चालेल. Vivo चा हा आगामी स्मार्टफोन 4जीबी रॅम वर लॉन्च होईल तसेच यात 64जीबी इंटरनल स्टोरेज दिली जाईल.

Vivo Y15 डुअल सिम तसेच 4जी वोएलटीई सपोर्ट सह बाजारात येईल. सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर दिला जाईल तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करेल. त्याचप्रमाणे पावर बॅकअप साठी Vivo Y15 मध्ये 5,000एमएएच ची दमदार बॅटरी दिली जाईल. आम्हाला मिळालेल्या माहिती नुसार Vivo Y15 एक्वा ब्लू आणि रेड कलर वेरिएंट मध्ये लॉन्च केला जाईल. फोनच्या किंमतीबद्दल बोलायचे तर आशा आहे कि वीवो आपला हा आगामी स्मार्टफोन 15,000 रुपयांपर्यंतच्या बजेट लॉन्च करेल. अशा आहे​ कि आगामी आठवड्यातच Vivo Y15 इंडियन स्मार्टफोन मार्केट मध्ये येईल.