यावर्षी जुलै मध्ये Vivo ने Z सीरीजची सुरवात केली होती. या अंतर्गत सर्वात आधी झेड1 प्रो सादर केला गेला होता. झेड सीरीज कंपनीने खासकरून ऑफलाइन स्टोर साठी सादर केली होती. नंतर वीवोने याचा अपग्रेडेड वर्जन संस्करण Z1x सादर केला. हा फोन भारतीय बाजारात सप्टेंबर मध्ये लॉन्च केला गेला होता आणि हा पण फ्लिपकार्ट वरच उपलब्ध झाला. क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 712 चिपसेट आधारित या फोनबद्दल खूप चर्चा होती आणि 15,000 रुपयांच्या बजेट मध्ये हा एक चांगला फोन आहे. आता वीवो फॅन्ससाठी चांगली बातमी आहे कि लवकरच कंपनी Vivo Z1x ऑफलाइन स्टोर वर पण सादर करणार आहे. 91मोबाईल्सला याची एक्सक्लूसिव माहिती मिळाली आहे.
याबाबत नाव न सांगण्याच्या अटीवर वीवोच्या एका अधिकाऱ्याने आम्हाला हि माहिती दिली कि “शाओमीच्या धर्तीवर खूप आधीच वीवो झेड सीरीजचे फोन ऑफलाइन स्टोर वर लॉन्च करण्याचे बोलले जात होते पण आता त्याला यश आले आहे. या अंतर्गत सर्वात आधी Vivo Z1x सादर केला जाईल. कंपनी याचा 8जीबी रॅम असेलला मॉडेल घेऊन येणार आहे. हेच कारण आहे कि या रेंज मध्ये आधीपासून असलेल्या वीवो एस1 ची किंमत कमी करण्यात आली आहे.”
ते म्हणाले कि “ऑफलाइन मध्ये आतापर्यंत फक्त 6जीबी रॅम असलेले मॉडेल 64जीबी आणि 128जीबी मेमरी सह उपलब्ध आहेत पण ऑफलाइन मध्ये कंपनी स्वस्तात 8जीबी रॅम असलेला मॉडेल सादर करेल.”
वीवो झेड1 एक्स चे स्पेसिफिकेशन
Vivo Z1x कंपनीने 6.38-इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्ले सह सादर केला आहे. हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट टेक्नॉलॉजी सह बाजारात आला आहे. कंपनीचा दावा आहे कि हा सेंसर 0.48 सेकंदात फोन अनलॉक करू शकतो. Vivo Z1x एंडरॉयड 9 पाई आधारित कलर ओएस वर लॉन्च झाला आहे जो आक्टाकोर प्रोसेसर सह 10एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 712 चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्स साठी या फोन मध्ये एड्रेनो 616 जीपीयू आहे.
Vivo Z1x कंपनीने 6जीबी रॅम वर सादर केला गेला आहे जो बाजारात 64जीबी स्टोरेज आणि 128जीबी मेमरी सह सेल साठी उपलब्ध होईल. Vivo Z1x एक डुअल सिम फोन आहे जो 4जी एलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी सोबतच पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 22.5वॉट फ्लॅशचार्ज टेक्नॉलॉजी असलेली 4,500एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे जी कंपनीच्या दाव्यानुसार फक्त 5 मिनिटांच्या चार्ज मध्ये 3 तासांचा टॉकटाईम देते. हा फोन फँटम पर्पल आणि फ्यूजन ब्लू कलर मध्ये विकत घेता येईल.
