भारत सरकारने अलीकडेच वीडियो मेकिंग ऍप TikTok सह 58 चीनी ऍप्स बॅन करण्याचा निर्णय घेतला होता. पण या बॅन केल्या गेलेल्या ऍप्सच्या नावावर काही नकली ऍप्स सध्या डाउनलोडसाठी उपलब्ध झाले आहेत जे यूजर्सचा डेटा चोरण्याचे काम करत आहेत. आता अश्याच एका ऍपची बातमी समोर येत आहे जो लोकांच्या फोनची महत्वाची व खाजगी माहिती चोरी करण्याचे काम करत आहे. मोबाईल यूजर्सकडे एक मेसेज येत आहे, ज्यात टिकटॉक सारखा ऍप डाउनलोड करण्याची लिंक दिली जात आहे, ज्याचे नाव टिकटॉक प्रो सांगण्यात आले आहे.
मेसेज काय आहे
अलीकडेच TOI च्या रिपोर्ट मध्ये समोर आले होते कि काही मोबाईल यूजर्सना एक मेसेज मिळत आहे. या मेसेज टिकटॉक सारखे ऍप डाउनलोड करण्याची लिंक दिली जात आहे, ज्याचे नाव TikTok Pro सांगण्यात येत आहे. लिंक वर क्लिक केल्यानंतर हा ऍप बाहेरच्या सोर्स वरून डाउनलोड होतो आणि इंस्टॉल झाल्यावर तुमच्या फोन मधील सर्व माहिती हॅकर्स कडे जाते.
पोलिसांनी दिली सूचना
हे प्रकरण गांभीर्याने घेऊन महाराष्ट्र साइबर सेलने आपल्या अधिकृत ट्वीटर हँडल वरून ट्विट करून सांगितले आहे कि सर्व नागरिकांना विनंती आहे कि टिकटॉकचा एक स्कॅम समोर आला आहे. टिकटॉक प्रो नावाचा एक मालवेयर सोशल मीडिया वर शेयर केला जात आहे. जर या नावाचा तुम्हाला कोणताही मेसेज मिळाला तर तो कोणाला फॉरवर्ड करू नका, तो लगेच डिलीट करा.
Citizens are requested to be aware of the new TikTok scam happening under the name of a malware app 'TikTok Pro'@DGPMaharashtra @CyberDost #CyberSafety #CyberSecurity pic.twitter.com/KqWk70KhbV
— Maharashtra Cyber (@MahaCyber1) July 8, 2020
TikTok Pro आहे काय
TikTok ऍप बॅन झाल्यानंतर आतापर्यंत मार्केट मध्ये अशाप्रकारचा कोणताही TikTok Pro ऍप आलेला नाही. तसेच हा ऍप गूगल प्ले स्टोर वर उपलब्ध नाही. हा थर्ड पार्टी म्हणजे बाहेरील सोर्स वरून डाउनलोड करावा लागतो जो तुमची खाजगी माहिती इतरांपर्यंत पोचवू शकतो.
गूगलने काढून टाकले 11 ऍप्स
गूगल अनेक दिवसांपासून फेक ऍप्स काढून टाकण्याचे काम करत आहे. काही दिवसांपूर्वी गूगलने प्ले स्टोर वरून 11 ऍप्स काढून टाकले होते. एंड्रॉइड ऍपला निशाना बनवणारा हा खास मालवेयर थेट यूजर्सच्या अकाउंट मध्ये घुसू शकतो. पण ज्या वापरकर्त्यांनी हे ऍप्स आधीच डाउनलोड केले आहेत, त्यांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी हे ऍप्स आपल्या फोन मधून काढून टाकले पाहिजेत.
