Home बातम्या फोल्डेबल फोन Motorola Razr 40 आणि Razr 40 Ultra लाँच, 12GB RAM सह मिळतो 64MP+32MP कॅमेरा

फोल्डेबल फोन Motorola Razr 40 आणि Razr 40 Ultra लाँच, 12GB RAM सह मिळतो 64MP+32MP कॅमेरा

Highlights
  • फोन चीनमध्ये सादर झाले आहेत.
  • ह्यात 12GB RAM सपोर्ट मिळतो.
  • सीरीज स्नॅपड्रॅगन 8+ Gen 1 सह येते.

मोटोरोलानं फोल्ड होणाऱ्या फोनची नवीन जेनरेशन Motorola Razr 40 आणि Motorola Razr 40 Ultra चीनमध्ये सादर केली आहे. दोन्ही फोल्डेबल फोन दमदार Snapdragon प्रोसेसर, 12GB पर्यंत रॅम, 144Hz स्क्रीन रिफ्रेश रेट, 64MP रियर आणि 32MP फ्रंट कॅमेरा सारख्या फीचर्ससह येतात. तुम्ही पुढे ह्यांचे फीचर्स, किंमत आणि स्पेसिफिकेशन्सची सविस्तर माहिती वाचू शकता.

Motorola Razr 40 सीरीजची किंमत

Motorola Razr 40 Ultra कंपनीनं दोन स्टोरेज ऑप्शनमध्ये सादर केला आहे. ज्यात 8GB रॅम + 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत 5699 युआन म्हणजे सुमारे 67,000 रुपये आहे. तर 12GB रॅम + 512GB मॉडेल 6399 युआन म्हणजे सुमारे 75,000 रुपये आहे.

कंपनीनं आपला Motorola Razr 40 डिवाइस 3 स्टोरेज व्हेरिएंटमध्ये सादर केला आहे. ज्यात 8GB रॅम + 128GB ऑप्शनची किंमत 3999 युआन म्हणजे सुमारे 46,000 रुपये आहे. फोनचा 8GB रॅम + 256GB स्टोरेज 4299 युआन म्हणजे सुमारे 50,000 रुपये आणि 12 जीबी रॅम +256GB मॉडेल 4699 युआन म्हणजे सुमारे 55,000 रुपयांमध्ये मिळेल.

Motorola Razr 40 चे स्पेसिफिकेशन्स

Motorola Razr 40 Ultra चे स्पेसिफिकेशन्स