Home बातम्या 6,000एमएएच बॅटरी असलेला हा फोन फक्त 6,999 रुपयांमध्ये झाला लॉन्च

6,000एमएएच बॅटरी असलेला हा फोन फक्त 6,999 रुपयांमध्ये झाला लॉन्च

Gionee Max

स्मार्टफोन मध्ये स्पेसिफिकेशन्स कितीही दमदार असले तरी जोपर्यंत फोनची बॅटरी चार्ज होत नाही तोपर्यंत तो काही उपयोगाचा नसतो. अनेक मोबाईल युजर्स असे आहेत जे मोठी बॅटरी असलेला डिवायस शोधात असतात. अश्याच लोकांचा विचार करून काल टेक ब्रँड जियोनीने भारतीय बाजारात एक नवीन स्मार्टफोन Gionee Max Pro लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन 6,000एमएएचच्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो आणि याची किंमत आहे फक्त 6,999 रुपये. (Gionee Max Pro price at rs 6999 launch in india with 6000mah battery)

Gionee Max Pro

जियोनीच्या या नवीन स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता, जियोनी मॅक्स प्रो 1560 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.52 इंचाच्या एचडी+ फुलव्यू डिस्प्लेवर लॉन्च केला गेला आहे जो 2.5डी कर्व्ड ग्लासने प्रोटेक्टेड आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 10 ओएसवर लॉन्च झाला आहे जो 1.6गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर स्प्रेडट्रम 9863ए चिपसेटवर चालतो.

हे देखील वाचा : Jio ने आणला बंपर इंटरनेट प्लान, 140 दिवसांत मिळेल 106GB डेटा, सुरुवाती किंमत 22 रुपये

फोटोग्राफीसाठी Gionee Max Pro डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे, त्यासोबत 2 मेगापिक्सलची बोका लेंस आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी जियोनी मॅक्स प्रो मध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन नाईट मोड, एचडीआर मोड सारख्या फीचर्ससह येतो.

जियोनी मॅक्स प्रो डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. 3.5एमएम जॅक आणि इतर बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच हा फोन गुगल असिस्टंट बटनला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 6,000एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे जी रिवर्स चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते. म्हणजे Gionee Max Pro ने दुसरे स्मार्टफोन पण चार्ज केले जाऊ शकतात.

हि आहे किंमत

Gionee Max Pro भारतात 3 जीबी रॅमवर लॉन्च केला गेला आहे जो 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोनची मेमरी माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 256 जीबी पर्यंत वाढवता येते. जियोनीने आपला नवीन फोन 6,999 रुपयांमध्ये बाजारात आला आहे जो Red, Royal Blue आणि Black कलरमध्ये शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर 8 मार्च पासून विक्रीसाठी उपलब्ध होईल.