Home बातम्या Jio यूजर्ससाठी आला नवीन सरप्राइज पॅक, रोज मिळेल 2 जीबी डेटा फ्री

Jio यूजर्ससाठी आला नवीन सरप्राइज पॅक, रोज मिळेल 2 जीबी डेटा फ्री

Jio सिम कार्ड

रिलायंस जियो अनेक दिवसांपासून आपल्या ग्राहकांसाठी कमी किंमतीत चांगले डेटा पॅक ऑफर करत आहे. देशात कोरोना वायरस लॉकडाउनमुळे कंपनीने अलीकडेच आपली वर्क फ्रॉम होम ऑफर पण सादर केली होती. तर आता जियोच्या ग्राहकांसाठी अजून एक खुशखबर आहे. कंपनी आपल्या ग्राहकांना 2 जीबी डेटा रोज देत आहे.

रिलायंस जियोच्या या पॅकला JIO DATA PACK असे नाव देण्यात आले आहे. कंपनी जियो डेटा पॅक मध्ये रोज 2 जीबी हाई-स्पीड डेटा अगदी मोफत देत आहे. पण या पॅकची वैधता 4 दिवस आहे. म्हणजे ग्राहकांना या मोफत डेटाचा फायदा फक्त 1 एप्रिल पर्यंतच मिळेल. या डेटासाठी तुम्हाला कोणताही रिचार्ज करण्याची आवश्यकता नाही.

विशेष म्हणजे जियोकडून 2जीबी अतिरिक्त डेटा काही निवडक यूजर्सना दिला जात आहे. कदाचित आगामी काळात सर्व ग्राहकांसाठी हा पॅक उपलब्ध होईल. तुम्हाला 2जीबी डेटा मिळत आहे कि नाही ते पुढील स्टेप्स फॉलो करून जाणून घ्या.

-सर्वात आधी तुमच्याकडे MyJio ऍप असला पाहिजे.

-त्यानंतर My Jio ऍप पर व्यू प्लान वर क्लिक करा.

-व्यू प्लान मध्ये तुम्हाला ऍक्टिव्ह प्लानच्या खाली वेगळा Jio Data Pack दिसेल.

-यात लिहिले आहे कि 2जीबी डेटा 1 एप्रिल पर्यंत रोज मिळेल.

रिलायंसचा JIO DATA PACK पॅक 28 मार्चला सुरु झाला होता जो 1 एप्रिल पर्यंत सुरु राहील. रिलायंस जियोचा हा प्लान लॉकडाउनमुळे घरातून काम करत असलेल्या यूजर्सना खूप उपयोगी पडेल. एकदा पुन्हा सांगू इच्छितो कि जियोने सादर केलेल्या या डेटा पॅकसाठी यूजर्सना कोणताही रिचार्ज करण्याची गरज नाही. कंपनी अश्या ऑफर्स अधूनमधून देत असते. या आधी पण कंपनीने वेळोवेळी असे सरप्राइज आपल्या ग्राहकांना दिले आहेत.