Homeबातम्याGoogle नं बनवला फोल्डेबल फोन! 10 मेला लाँच होईल Pixel Fold, पाहा डिजाईन
Google नं बनवला फोल्डेबल फोन! 10 मेला लाँच होईल Pixel Fold, पाहा डिजाईन
Siddhesh Jadhav
Highlights
Pixel Fold 10 मेला लाँच होईल.
हा पहिला Google Foldable Phone आहे.
याची टक्कर Samsung Galaxy Fold शी होईल.
टेक जायंट गुगलनं आपली नवीन स्मार्टफोन लाइन जगासमोर ठेवली आहे. कंपनीनं आपला पहिला फोल्डेबल फोन Pixel Fold सादर केला आहे. गुगलच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून नवीन फोनची माहिती देण्यात आली आहे. हा हँडसेट 10 मे 2023 रोजी आयोजित Google I/O मधून ग्राहकांच्या भेटीच्या येऊ शकतो.
‘पिक्सल फोल्ड’ ची डिजाईन
Google Pixel Fold चा लुक मोठ्या प्रमाणात Samsung Galaxy Fold फोन्स सारखा आहे. या फोनमध्ये वर्टिकल हिंज देण्यात आला आहे ज्यामुळे हा मोबाइल एखाद्या डायरी प्रमाणे उघडतो तसेच अनफोल्ड होऊन टॅबलेटचा आकार घेतो.
प्रायमरी स्क्रीन म्हणजे फोनची फोल्ड केल्यानंतर फ्रंटला येणारा डिस्प्ले पंच-होल स्टाईलसह देण्यात आला आहे ज्याच्या चारही बाजूला नॅरो बेजल्स आहेत.
अनफोल्ड झाल्यानंतर हा गुगल पिक्सल फोन टॅबलेट डिवायस सारखा वाटतो, ज्यात स्क्रीनच्या चारही बाजूंना रुंद बेजल्स देण्यात आले आहेत.
सेकंडरी स्क्रीनच्या वरच्या बाजूला डावीकडे असलेल्या बेजलवर कॅमेरा लेन्स आहे जी सेल्फी तसेच व्हिडीओ कॉलिंगसाठी उपयुक्त ठरते.
फोनच्या बॅक पॅनलवर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे जो वर हॉरिजॉन्टल शेपमध्ये फिट करण्यात आला आहे.
गुगल फोल्ड फोनच्या रियर कॅमेरा सेटअपमध्ये तीन लेन्ससह एक एलईडी लाईट तर एक राउंड शेप स्पिकर आहे.
Google ची ब्रँडिंग फोनच्या बॅक पॅनलवर देण्यात आली आहे तर फोल्ड हिंजवर लोगो किंवा डिजाईन नाही.
फोनच्या वरच्या पॅनलवर डावीकडे सिम स्लॉट आहे तर डावीकडे स्पिकर ग्रिल देण्यात आली आहे.
वॉल्यूम रॉकर तसेच पावर बटन या नवीन Pixel Fold च्या उजव्या पॅनलवर देण्यात आले आहेत.
टीजर व्हिडीओमध्ये दिसत नाहीत परंतु यूएसबी पोर्ट फोनच्या लोवर पॅनलवर मिळू शकतो. यात टाईप-सी स्लॉट असू शकतो.
गुगल पिक्सल फोल्डचे स्पेसिफिकेशन्स
5.8″ Primary display
7.6″ Secondary display
Google Tensor G2
कंपनीनं फोनचा लुक तर शेयर केला परंतु अजून फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली नाही. लीक्सनुसार, या फोनची प्रायमरी स्क्रीन 5.8 इंच असेल तसेच अनफोल्ड झाल्यानंतर समोर येणाऱ्या सेकंडरी डिस्प्लेची साईज 7.6 इंच असेल. पिक्सल फोल्ड फोनमध्ये प्रोसेसिंगसाठी गुगलचा Tensor G2 चिपसेट दिला जाऊ शकतो. हे देखील वाचा: पावरफुल Motorola Edge 40 आला बाजरात; जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
गुगलच्या फोल्डेबल फोनची किंमत
Google Foldable Phone संबंधित जास्त माहिती समोर आली नाही परंतु लीकनुसार हा पिक्सल फोल्ड फोन $1700 रुपयांमध्ये लाँच होऊ शकतो. ही किंमत भारतीय करंसीनुसार 1,35,000 रुपयांच्या आसपास आहे. ही फोनची परदेशातील किंमत असू शकते, भारतात हा फोन यापेक्षा कमी किंमतीत येऊ शकतो.