हि बातमी समोर येऊन जवळपास सहा महीने झाले आहेत कि टेक कंपनी Google आपल्या ‘पिक्सल सीरीज’ च्या स्वस्त स्मार्टफोन वर काम करत आहे आणि हा Pixel 4a नावासह लॉन्च केला जाईल. जेव्हा पासून माहिती समोर आली आहे तेव्हा पासून पिक्सलचे चाहते फोनची वाट बघत आहेत. कोरोना वायरसमुळे हा फोन बाजारात येण्यास वेळ लागत आहे. काही दिवसांपूर्वी गूगल पिक्सल 4ए फ्रेंच रिटेलर वेबसाइट वर दिसला होता, तर आता हा फोन सर्टिफिकेशन्स साइट एफसीसी वर पण लिस्ट झाला आहे.
Google Pixel 4a आता सर्टिफिकेशन्स साइट एफसीसी वर दिसला आहे. एफसीसी वर हा फोन तीन मॉडेल्स मध्ये लिस्ट झाला आहे ज्यांचे नंबर G025J, G025M आणि G025N आहेत. एफसीसी च्या या लिस्टिंग मध्ये पिक्सल 4ए चे कोणतेही स्पेसिफिकेशन्स किंवा इतर माहिती शेयर करण्यात आलेली नाही पण या सर्टिफिकेशन साइट वरून हे स्पष्ट झाले आहे कि पिक्सल 4ए स्मार्टफोन आता लवकरच टेक बाजारात येऊ शकतो. अनेक लीक्स मध्ये या फोनचे अधिकांश स्पेसिफिकेशन्स आधीच समोर आले आहेत.
Google Pixel 4a
फोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता लीक नुसार हा फोन पिक्सल 3ए प्रमाणेच प्लास्टिक बॉडी वर सादर केला जाईल. रिपोर्टनुसार पिक्सल 4ए पंच-होल डिस्प्ले वर लॉन्च केला जाईल आणि या फोन मध्ये 2340 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेली 5.81 इंचाची ओएलईडी स्क्रीन मिळेल. लीकनुसार हा फोन आक्टाकोर प्रोसेसरला सपोर्ट करेल, सोबतच Google Pixel 4a मध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 730 चिपसेट मिळेल. ग्राफिक्ससाठी या गूगल फोन मध्ये ऐड्रेनो 618 जीपीयू असल्याचे समोर आले आहे.
Google Pixel 4a च्या बॅक पॅनल वर चौकोनी आकाराचा कॅमेरा सेटअप दिला जाईल जो डावीकडे असेल. फोटोग्राफीसाठी 12.2 मेगापिक्सल सेंसर असलेला रियर कॅमेरा सेटअप असल्याचे सांगण्यात आले आहे जो ओआईएस व आटोफोकस सारख्या फीचर्स सह येईल. तसेच सेल्फीसाठी या फोन मध्ये 84 डिग्री फिल्ड व्यू असलेला 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. लीकनुसार पिक्सल 4ए 6 जीबी रॅम वर लॉन्च केला जाईल तसेच हा फोन 64 जीबी स्टोरेज आणि 128 जीबी स्टोरेजला सपोर्ट करेल.
गूगल पिक्सल 4ए बद्दल या लीक मध्ये सांगण्यात आले आहे कि हा फोन गूगलच्या टाइटेन एम सिक्योरिटी चिप सह येईल तसेच या डिवाइस मध्ये हेडफोन जॅक पण दिला जाईल. लीक नुसार Google Pixel 4a ब्लॅक आणि ब्लू कलर मध्ये लॉन्च केला जाईल आणि या फोनची किंमत 399 यूएस डॉलरच्या आसपास म्हणजे जवळपास 40,000 रुपये असेल.
समोर आलेल्या रिपोर्ट्सनुसार Google Pixel 4a इंडियन मार्केट मध्ये पण लॉन्च केला जाऊ शकतो. तुमच्या लक्षात असेल कि कि हार्डवेयरच्या समस्येमुळे Google Pixel 4 भारतात लॉन्च नव्हता झाला, पण गूगल जगात वेगाने वाढणाऱ्या भारतीय बाजारपेठेला सोडू इच्छित नाही. यामुळे कंपनी पिक्सल 4ए इंडियन मार्केट मध्ये पण लॉन्च करेल.
गूगल पिक्सल 4ए वीडियो
