Home बातम्या Google चा फोन Pixel 7a भारतात लाँच; फीचर्सच्या जीवावर देईल टक्कर

Google चा फोन Pixel 7a भारतात लाँच; फीचर्सच्या जीवावर देईल टक्कर

Highlights
  • हा गुगल फोन IP67 रेटेड आहे ज्यामुळे वॉटर व डस्ट प्रूफ बनतो.
  • गुगल पिक्सल 7ए मध्ये ड्युअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे.
  • हा गुगल फोन 4,385एमएएच बॅटरीसह लाँच झाला आहे.

अनेक दिवस चर्चेत राहिल्यानंतर टेक दिग्गज गुगलनं भारतात आपला नवीन मोबाइल सादर केला आहे. कंपनीनं Google Pixel 7A भारतात लाँच करण्यात आला आहे. हा गुगल अँड्रॉइड फोन 43,999 रुपयांमध्ये बाजारात आला आहे. ज्यांच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सची संपूर्ण माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

गुगल पिक्सल 7ए ची किंमत

Google Pixel 7A सिंगल मेमरी व्हेरिएंटमध्ये भारतात लाँच झाला आहे. या फोनमध्ये 8जीबी रॅम + 128जीबी मेमरी देण्यात आली आहे. या फोनची किंमत 43,999 रुपये आहे जो Charcoal, Sea आणि Snow तीन रंगात विकत घेता येईल. एचडीएफसी युजर्सना फोन खरेदीवर 4,000 रुपयांचा डिस्काउंट दिला जाईल जोडीला पिक्सल 7ए ची इफेक्टिव्ह किंमत 39,999 रुपये होईल. तसेच फ्लिपकार्टवर 4,000 रुपयांची एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहे. पिक्सल 7ए खरेदी केल्यावर 3 महिन्याचे YouTube Premium फ्री मिळतं.

गुगल पिक्सल 7ए चे स्पेसिफिकेशन्स

Google Pixel 7A Screen

पिक्सल 7ए स्मार्टफोन पंच-होल स्टाईल स्क्रीनवर लाँच झाला आहे जिचा आकार 6.1 इंचाचा आहे. हा 1080 x 2400 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या फुलएचडी+ डिस्प्ले आहे जो ओएलईडी पॅनलवर बनली आहे. फोन स्क्रीन 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते, तसेच याला कोर्निंग गोरिल्ला ग्लासची सुरक्षा देण्यात आली आहे. यात 429पीपीआय आणि 16एम कलर्स सारखे फीचर्स मिळतात.

Google Pixel 7A processor

पिक्सल 7 सीरीजचा हा नवीन मोबाइल फोन गुगलनं बनवलेल्या नेक्स्ट जेनरेशन चिपसेट Google Tensor G2 वर लाँच करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा प्रोसेसर Pixel 7 आणि Pixel 7 Pro मध्ये देखील देण्यात आला होता. हा चिपसेट गुगलच्या अ‍ॅडव्हान्स मशीन लर्निंगचा भाग आहे जो फोन फास्ट, इफिशिएंट आणि सिक्योर बनतो. हा प्रोसेसर गुगल एआयसह चालतो.

Google Pixel 7A Camera

फोटोग्राफीसाठी गुगल पिक्सल 7ए मध्ये ड्युअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. या बॅक कॅमेरा सेटअपमध्ये प्रायमरी सेन्सर 64 मेगापिक्सलचा आहे जो एफ/1.89 अपर्चर असलेली सोनी आयएमएक्स787 लेन्स आहे. तसेच हा फोन एफ/2.2 अपर्चर असलेल्या 13 मेगापिक्सलच्या वाइड अँगल लेन्सला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 13एमपी लेन्स मिळतो.

Google Pixel 7A Battery

हा गुगल फोन 4,385एमएएच बॅटरीसह लाँच झाला आहे. पिक्सल 7ए बद्दल कंपनीचा दावा आहे की एकदा फुल चार्ज झाल्यानंतर हा 24 तास चालू शकतो. तसेच बॅटरी सेवर फीचर ऑन केल्यावर हा 72 तासांपर्यंतचा बॅकअप देऊ शकतो. हा गुगल फोन वायरलेस पद्धतीनं चार्ज करता येतो.

गुगल पिक्सल 7ए चे फीचर्स

या फोनमध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो. या पिक्सल फोन रीसायकल अ‍ॅल्युमिनियमपासून बनवण्यात आला आहे. हा गुगल फोन IP67 रेटेड आहे ज्यामुळे हा वॉटर व डस्ट प्रूफ बनतो. फोनमध्ये Super Res Zoom द्वारे दुरून क्लोजअप पोर्टरेट काढता येतो. Extreme Battery Saver वर हा फोन 72 तास वापरता येतो. हा फोन 5 वर्षांच्या सिक्योरिटी अपडेटसह येईल. या पिक्सल फोनवर Google One 100जीबी पर्यंत डेटा बॅकअप मिळतो.