Home बातम्या फोन मधून चीनी ऍप्स काढून टाकणारे भारतीय App प्‍ले स्‍टोर वरून काढून टाकण्यात आला, होते लाखो यूजर्स

फोन मधून चीनी ऍप्स काढून टाकणारे भारतीय App प्‍ले स्‍टोर वरून काढून टाकण्यात आला, होते लाखो यूजर्स

भारतात चीन विरोधात खूप राग आहे. यामागे कोरोना वायरस आणि लडाख मधील चीनी सेनेची आगेकूच हि कारणे आहेत. याचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो कि लोक सोशल मीडिया वर चीन मध्ये बनलेल्या वस्तू व चीनी कंपन्यांचा बहिष्कार करण्याची मागणी करत आहेत. तसेच या काळात एक असा ऍप आला होता जो तुमच्या फोन्स मधून चीनी ऍप काढून टाकण्यासाठी बनवण्यात आला होता. या ऍपचे नाव ‘रिमूव चायना ऍप’ होते. हा इतका प्रसिद्ध झाला कि लॉन्च नंतर दोन आठवड्यांमध्ये 50 लाखांपेक्षा जास्त लोकांनी हा डाउनलोड केला होता. पण आता माहिती समोर आली आहे कि गूगल प्‍ले स्‍टोर वरून हा ऍप काढून टाकण्यात आला आहे.

याचा अर्थ असा आहे कि एंडरॉयड मोबाईल यूजर्ससाठी Remove China Apps प्‍ले स्‍टोर वर डाउनलोडसाठी उपलब्‍ध नाही. कंपनीने याबाबत माहिती दिली नाही कि ऍप का काढून टाकण्यात आला आहे. तसेच हा ऍप पुन्हा डाउनलोडसाठी उपलब्ध केला जाईल कि नाही हे देखील समजले नाही.

जयपुर मधील ऍप डेवलपर OneTouchAppLabs ने हि घोषणा ट्विटर वर केली आहे कि ऍप प्ले स्टोर वरून निलंबित करण्यात आला आहे. फर्मने ऍप का काढून टाकण्यात आला याची माहिती दिली नाही. ‘वन टच ऍपलॅब’ ने ट्वीट करून म्हटले ‘गूगलने #RemoveChinaApps गूगल प्‍ले स्‍टोर वरून काढून टाकला आहे. गेल्या दोन आठवड्यांत तुमचा जो प्रतिसाद मिळाला त्यासाठी धन्यवाद… तुम्ही कमाल आहात!’

https://img.hi.91mobiles.com/uploads/2020/06/image-3.png

Mitron ऍप पण गूगल प्ले स्टोर वरून गायब

अलीकडेच गूगलने भारतीय शॉर्ट वीडियो ऍप Mitron पण प्ले स्टोर वरून काढून टाकला होता. टीकटॉक चा प्रतिस्पर्धी म्हणून प्रसिद्ध झालेला मित्रों ऍप आता डाउनलोडसाठी उपलब्ध नाही. तसेच काही दिवसांपूर्वी बंटी आली होती कि मित्रों ऍप पाकिस्तानच्या सॉफ्टवेयर डेवलपरने डेवलप केला आणि नंतर भारतीयांनी विकत घेतला होता.

गूगलने या ऍपला स्पॅम आणि मिनिमम फंक्शनॅलिटी पॉलिसीचे उल्लंघन केल्यामुळे प्ले स्टोर मधून हटवले. गूगलच्या या पॉलिसी मध्ये असे लिहिण्यात आले आहे कि दुसऱ्या ऍप्सच्या कॉन्टेंट मध्ये बदल न करता किंवा काही अतिरिक्त कोड न जोडता अपलोड करणे पॉलिसीच्या विरोधात आहे.