वनप्लस (OnePlus) कडे मिड रेंज आणि फ्लॅगशिप फोनची मोठी यादिली आहे. जर तुम्ही वनप्लसचा फोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. सध्या अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलमध्ये वनप्लसचे फोन आकर्षक किंमतीत उपलब्ध आहेत. त्याचबरोबर जर एसबीआय क्रेडिट कार्ड किंवा एसबीआय डेबिट कार्डचा वापर केला तर 10 टक्के इन्स्टंट सूट मिळवता येईल. चला जाणून घेऊया अॅमेझॉन सेलमध्ये वनप्लसच्या फोनवरील ऑफर्स:
OnePlus Nord CE 3 Lite 5G
वनप्लस नॉर्ड सीई 3 लाइट 5जी (OnePlus Nord CE 3 Lite 5G) एक चांगला मिड रेंज डिवाइस आहे. हा 6.72-इंच (120Hz) FHD+ अडॅप्टिव रिफ्रेश रेटसह येतो. त्याचबरोबर ह्यात 680 निट्स पिक ब्राइटनेस मिळते. कॅमेरा फीचर पाहता, ह्यात EIS सह 108MP चा रियर कॅमेरा आहे, तसेच फ्रंटला 16MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. फोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 5G प्रोसेसरवर चालतो. कंपनीनं या फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी आणि 67W SuperVOOC फास्ट चार्जिंग दिली आहे.
सेलिंग प्राइस: 19,999 रुपये
डील प्राइस: 19,499 (कुपन डिस्काउंटसह)
OnePlus 11 5G
वनप्लस 11 5जी (OnePlus 11 5G) पावरफुल फ्लॅगशिप डिवाइस आहे. ह्यात 6.7-इंचाचा (120Hz) अॅमोलेड QHD डिस्प्ले आहे. हा HDR 10+, sRGB आणि 10-bit कलर डेप्थला सपोर्ट करतो. फोन स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 प्रोसेसरवर चालतो, जो शानदार परफॉर्मन्स देतो. फोटोग्राफीसाठी 50MP चा सोनी IMX890 OIS प्रायमरी कॅमेरा आणि 16MP चा फ्रंट सेल्फी कॅमेरा आहे, जो EIS सपोर्टसह येतो. कंपनीनं फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी दिली आहे, जी 100W SuperVOOC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
सेलिंग प्राइस:56,999 रुपये
डील प्राइस: 49,999 रुपये ( बँक आणि कुपन डिस्काउंटसह)
OnePlus Nord 3 5G
वनप्लस नॉर्ड 3 5जी (OnePlus Nord 3 5G) सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या सर्वात चांगल्या मिड रेंज डिवाइस पैकी एक आहे. हा पावरफुल MediaTek Dimensity 9000 चिपसेटवर चालतो. ह्यात 6.74-इंचाचा (120Hz) अॅमोलेड FHD+ डिस्प्ले आहे. डिस्प्ले HDR 10+, sRGB आणि 10-bit कलर डेप्थला सपोर्ट करतो. फोटोग्राफी पाहता, ह्यात 50MP चा प्रायमरी कॅमेरा आहे, जो OIS सपोर्टसह येतो, तसेच ह्यात 16MP चा फ्रंट कॅमेरा आहे, जो EIS सह आला आहे. फोनमध्ये कंपनीनं 5,000mAh ची बॅटरी दिली आहे, जी 80W SuperVOOC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
सेलिंग प्राइस: 33,999 रुपये
डील प्राइस: 28,999 रुपये (बँक आणि कुपन डिस्काउंटसह)
OnePlus Nord CE 3 5G
वनप्लस नॉर्ड सीई 3 5जी डिवाइस अॅमेझॉन सेलमध्ये आकर्षक सूटसह उपलब्ध आहे. ह्यात कंपनीनं 6.7-इंचाचा (120Hz) FHD+ अॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे, जो HDR 10+, sRGB आणि 10-bit कलर डेप्थला सपोर्ट करतो. कॅमेरा फीचर पाहता ह्यात 50MP चा प्रायमरी कॅमेरा आहे, जो OIS सह येतो, तसेच 16MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. डिवाइसमध्ये कंपनीनं क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 782G प्रोसेसर दिला आहे. हा हँडसेट 5,000mAh बॅटरी आणि 80W SuperVOOC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो.
सेलिंग प्राइस: 26,999 रुपये
डील प्राइस: 22,999 रुपये (बँक आणि कुपन डिस्काउंटसह)
OnePlus 11R 5G
वनप्लस 11 आर 5जी (OnePlus 11R 5G) प्रीमियम 5जी डिवाइस आहे. हा फोन 6.7-इंच (2772 x 1240p) 120Hz सुपर फ्लूइड अॅमोलेड डिस्प्लेसह येतो. कॅमेरा फीचर पाहता, ह्यात 50MP चा Sony IMX890 प्रायमरी कॅमेरा आहे, जो OIS सह येतो, तसेच फ्रंटला 16MP सेल्फी कॅमेरा (EIS) आहे. चांगल्या फोटोग्राफीसाठी नाइटस्केप, अल्ट्रा एचडीआर, स्मार्ट सीन रिकॉग्निशन, प्रो मोड, टिल्ट शिफ्ट मोड, लॉन्ग एक्सपोजर, ड्युअल-व्यू व्हिडीओ, व्हिडीओ नाइटस्केप, व्हिडीओ एचडीआर, फोकस ट्रॅकिंग, टाइमलॅप्स इत्यादी फीचर्स आहेत. हा फोन स्नॅपड्रॅगन 8+ जेन 1 प्रोसेसरवर चालतो. कंपनीनं ह्यात 5,000mAh ची बॅटरी दिली आहे, जी 100W SuperVOOC फास्ट चार्जिंग सपोर्टसह आली आहे.
सेलिंग प्राइस: 39,999 रुपये
डील प्राइस: 37,999 रुपये (बँक डिस्काउंटसह)
OnePlus 10R 5G
वनप्लस 10आर अॅमेझॉन सेलमध्ये आकर्षक सूटसह उपलब्ध आहे. ह्या हँडसेट मध्ये 6.7-इंचाचा 120Hz IRIS डिस्प्ले, FHD रिजॉल्यूशनसह आला आहे. ह्यात तुम्हाला हायपर टच मोड, रीडिंग मोड, नोइट मोड, कंफर्ट मोड इत्यादी फीचर्स आहेत. या डिवाइसमध्ये कंपनीनं MediaTek Dimensity 8100 Max प्रोसेसरचा वापर केला आहे. तसेच, फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी आणि 80W सुपरवूक फास्ट चार्जिंगचा सपोर्ट आहे. फोटोग्राफी पाहता, फोनमध्ये 50MP चा Sony IMX766 प्रायमरी कॅमेरा आहे, तसेच फ्रंटला 16MP सोनी IMX471 सेल्फी कॅमेरा आहे.
सेलिंग प्राइस: 34,999 रुपये
डील प्राइस: 24,999 रुपये (बँक डिस्काउंटसह)
OnePlus 10T 5G
OnePlus 10T 5G पण एक शानदार मिड रेंज डिवाइस आहे. हा फोन 6.7-इंच FHD+ (120Hz) फ्लूइड अॅमोलेड डिस्प्लेसह येतो, जो HDR 10+, sRGB, डिस्प्ले P3 आणि 10-बिट कलर डेप्थला सपोर्ट करते. ह्यात कंपनीनं 4,800mAh ची बॅटरी दिली आहे, जी 150W सुपरवूक चार्जिंग सपोर्टसह येते. हँडसेटमध्ये हायपरबूस्ट गेमिंग इंजिन देण्यात आला आहे, जो चांगला गेमिंग एक्सपीरियंस देतो. तसेच, हा क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8+ जेन 1 प्रोसेसरसह येतो. ह्यात 50MP चा Sony IMX766 प्रायमरी कॅमेरा आहे, जो OIS सपोर्टसह येतो. तसेच ह्यात 16MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.
सेलिंग प्राइस: 49,999 रुपये
डील प्राइस: 34,999 रुपये (बँक डिस्काउंटसह)
OnePlus 10 Pro 5G
वनप्लस 10 प्रो प्रीमियम स्मार्टफोन आहे, जो पावरफुल परफॉर्मन्स देतो. हा हँडसेट 6.7-इंचाच्या (120Hz) QHD+ फ्लूइड अॅमोलेड एलटीपीओ डिस्प्लेसह येतो. ह्यात कंपनीनं क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 1 प्रोसेसर दिला आहे. तसेच, फोनमध्ये सेकंड जेनरेशन Hasslenblad कॅमेरा आहे. ह्याच्या रियर पॅनलवर 48MP सोनी IMX789 प्रायमरी कॅमेरा, 50MP अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा आणि 8MP चा टेलीफोटो कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच फ्रंटला 32MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.
सेलिंग प्राइस: 66,999 रुपये
डील प्राइस: 47,999 (बँक डिस्काउंटसह)
