Home बातम्या जियोफोनला टक्कर देईल नोकिया, घेऊन येत आहे नवीन 4जी फीचर फोन

जियोफोनला टक्कर देईल नोकिया, घेऊन येत आहे नवीन 4जी फीचर फोन

नोकिया ने याच महिन्यात भारतीय मोबाईल बाजारात आपला 4जी फीचर फोन नोकिया 8110 लॉन्च केला आहे. हा शानदार फोन आज पासून देशात सेल साठी उपलब्ध झाला आहे. नोकिया 8110 4जी 22 वर्षांपूर्वी लॉन्च झालेल्या नोकिया 8110 मॅट्रिक्सचे नवे स्वरूप आहे. नवीन नोकिया 8110 भारतात लॉन्च झालेला कंपनीचा पहिला 4जी फीचर फोन आहे. पण अशीही बातमी येत आहे कि नोकिया लवकरच यांची संख्या वाढवणार आहे आणि येत्या काही दिवसांत अजून 4जी फीचर फोन इंडियन मार्केट मध्ये लॉन्च करण्याची तयारी करत आहे,

नोकिया चे मालकी हक्क असणारी कंपनी एचएमडी ग्लोबल चे इंडिया वाइस प्रेजीडेंट अजय मेहता यांनी नोकियाच्या योजनेचा खुलासा केला आहे. हि माहिती अजय मेहता यांनी डीएनए इंडिया सोबत झालेल्या मुलाखतीती दिली. डीएनएच्या रिपोर्ट नुसार नोकिया ब्रांड नोकिया 8110 4जी भारतात लॉन्च केल्यानंतर अजून पण 4जी फीचर फोन देशात आणू इच्छित आहे. नोकियाचे हे नवीन 4जी फीचर फोन लवकरच बाजारात येतील.

विशेष म्हणजे रिलायंस जियो ने लॉन्च केलेले जियोफोन आणि जियोफोन 2 भारतातील फीचर फोन बाजारात नंबर वन आहेत. हे असे फीचर फोन आहेत जे 4जी कनेक्टिविटी सह येतात आणि देशाच्या फीचरफोन बाजारावर राज्य करतात. नोकिया 8110 4जी आल्यामुळे रिलायंसच्या जियोफोन आणि जियोफोन 2 ला थेट टक्कर मिळणार आहे. इंडियन मार्केट मध्ये जियो ने आपला दबदबा आधीच बनवला असल्यामुळे नोकिया 8110 साठी हि स्पर्धा सोप्पी नसेल.

जियोशी स्पर्धा करण्यासाठी आणि इंडियन फीचर फोन बाजारात आपले नाव कमावण्यासाठी नोकिया येत्या काळात नवीन 4जी फीचर फोन घेऊन येऊ इच्छित आहे. किंमतीच्या बाबतीत जियोफोन आणि जियोफोन 2 नोकिया 8110 4जी पेक्षा स्वस्त आहेत तसेच या 4जी फीचर फोनला नेटवर्क कनेक्टिविटी साठी एखाद्या टेलीकॉम आॅपरेटरची मदत घ्यावी लागेल. त्यामुळे भारतीय फीचर फोन बाजारात नोकियाला अडचणी येऊ शकतात.

नोकिया 8110 4जी फीचर फोन पाहता हा फोन आज पासून देशात सेल साठी उपलब्ध होणार आहे. हा फोन आॅनलाईन प्लेटफॉर्म सोबतच आॅफलाईन रिटेल स्टोर्स वरून विकत घेता येईल. नोकिया 8110 4जी ची किंमत 5,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन जियो इंटीग्रेशन सह येतो ज्यामुळे फोन मध्ये जियोचा नंबर वापरल्यास ग्राहकांना 544जीबी 4जी डेटा मोफत मिळेल.