Huawei च्या सब-ब्रँड Honor ने लंडन मध्ये आयोजित मध्ये एका इवेंट मध्ये Honor 20 आणि Honor 20 Pro लॉन्च केले आहेत. इवेंट मध्ये सादर केला गेलेला Honor 20 Pro या सीरीजचा सर्वात प्रीमियम हँडसेट आहे. तसेच Honor 20 Lite ग्लोबल मार्केट मध्ये पण आला आहे. हा हँडसेट आधीच मलेशिया आणि यूनाइटेड किंगडम मध्ये लॉन्च झाला आहे.
किंमत
किंमतीबद्दल बोलायचे तर Honor 20 स्मार्टफोनच्या 6जीबी रॅम आणि 128जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 499 यूरो (जवळपास 38775 रुपये) आहे. तर Honor 20 Pro च्या 6जीबी रॅम आणि 128जीबी स्टेरेज वाले वेरिएंटची किंमत 599 यूरो (जवळपास 46546 रुपये) आहे. दोन्ही स्मार्टफोनची विक्री कधी होईल सध्या हि माहिती कंपनीने शेयर केली नाही. तसेच Honor 20 Lite ची किंमत 299 यूरो (जवळपास 23,000 रुपये) ठेवण्यात आली आहे. भारतात या स्मार्टफोनची किंमत किती असेल, याची घोषणा कंपनी 11 जूनला करेल. पण भारतात या फोनची विक्री ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्ट वरून होईल हि माहिती समोर आली आहे. कलर वेरिएंट बद्दल बोलायचे तर दोन्ही स्मार्टफोन ग्रेडिएंट फिनिश सह येतील. Honor 20 स्मार्टफोन दोन कलर ऑप्शन Sapphire Blue आणि Midnight Black मध्ये विक्री साठी येतील. तसेच Honor 20 Pro स्मार्टफोन Phantom Blue आणि Phantom Black कलर मध्ये विक्री साठी येतील.
Honor 20 चे स्पेसिफिकेशन्स
Honor 20 मध्ये 6.26-इंचाचा एफएचडी+ ऑल व्यू डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रेजोल्यूशन 2340×1080 पिक्सल आहे. तसेच फोनचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 91.6 टक्के आहे. Honor 20 मध्ये हुवावे ने आपला किरिन 980 प्रोसेसर दिला आहे. फोन मध्ये 6जीबी रॅम आणि 128जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.
फोटोग्राफी साठी फोनच्या मागे 4 कॅमेरा देण्यात आले आहेत. यात एफ/1.8 अपर्चर सह 48-मेगापिक्सलचा सोनी IMX586 सेंसर, एफ/2.2 अपर्चर वाला 16-मेगापिक्सलचा सुपर वाइड ऐंगल सेंसर, एफ/2.4 अपर्चर सह 117 डिग्री सुपर वाइड ऐंगल वाला 2-मेगापिक्सलचा डेप्थ असिस्ट कॅमेरा आणि एक 2-मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे ज्याचे अपर्चर एफ/2.4 आहे. तसेच वीडियो कॉलिंग आणि सेल्फी साठी फोन मध्ये 32-मेगापिक्सलचा पंच होल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनला पावर देण्यासाठी यात 3,750एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 22.5W सुपर चार्जला सपोर्ट करते. याबद्दल कंपनीने दावा केला आहे कि फक्त 30 मिनिटांत फोन 50 पर्सेंट चार्ज केला जाऊ शकतो.
Honor 20 Pro चे स्पेसिफिकेशन्स
Honor 20 Pro कंपनी द्वारा लॉन्च केला गेलेला Honor 20 चा ऍडवांस वर्जन आहे. दोन्ही डिवाइसचे स्पेसिफिकेशन्स जवळपास एकसारखे आहेत. पण, बॅटरी आणि कॅमेऱ्याच्या बाबतीती दोन्ही वेगळे आहेत. Honor 20 Pro मध्ये पण कंपनीने 6.26-इंचाचा फुल-एचडी+ एलसीडी आईपीएस डिस्प्ले दिला आहे. तसेच फोन मध्ये Huawei चा हाई-एंड HiSilicon Kirin 980 ओक्टा-कोर SoC आहे जो 7nm FinFET टेक्नोलॉजी वर बनला आहे. फोन 6GB रॅम सह 128GB इंटरनल स्टोरेज सह येतो.
फोटोग्राफी साठी फोन मध्ये क्वार्ड कॅमेरा सेटअप आहे. कंपनी ने यात 8-मेगापिक्सलची टेलीफोटो लेन्स दिलीआहे जी 3X ऑप्टिकल जूमला सपोर्ट करते. इतर तीन लेन्स पाहता यात 48-मेगापिक्सलचा सोनी IMX586 सेंसर, 16-मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड एंगल लेन्स आणि 2-मेगापिक्सलचा माइक्रो सेंसर आहे. Honor 20 Pro स्मार्टफोन एंडरॉयड 9 पाई वर बेस्ड मॅजिक यूआई 2.1 वर चालतो. सोबतच स्मार्टफोन 22.5W फास्ट चार्जिंग सुपरफास्टला सपोर्ट करतो ज्यात यूएसबी टाइप-सी पोर्ट आहे. तसेच फोन मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी आहे.
