Home बातम्या 12GB रॅम, 4 इंचाच्या कव्हर डिस्प्लेसह Honor Magic V Flip चीनमध्ये झाला लाँच, जाणून घ्या किंमत

12GB रॅम, 4 इंचाच्या कव्हर डिस्प्लेसह Honor Magic V Flip चीनमध्ये झाला लाँच, जाणून घ्या किंमत

ऑनरने होम मार्केट चीनमध्ये आपल्या पहिल्या फ्लिप स्मार्टफोनला लाँच केले आहे. हा Honor Magic V Flip नावाने सुंदर डिझाईन आणि पावरफुल स्पेसिफिकेशन्ससह येतो. यात 4 इंचाचा मोठा कव्हर आणि 6.8 इंचाचा इनर डिस्प्ले, 12GB रॅम + 1 टीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज, Snapdragon 8+ Gen 1 चिपसेट, 4800mAh बॅटरी सारखे अनेक फिचर्स देण्यात आले आहेत. चला, पुढे मोबाईलची किंमत सविस्तर जाणून घेऊया.

Honor Magic V Flip चे स्पेसिफिकेशन

डिस्प्ले: Honor Magic V Flip मध्ये बॅक पॅनलवर 4 इंचाचा मोठा LTPO अ‍ॅमोलेड कव्हर डिस्प्ले देण्यात आला आहे. यावर 120Hz रिफ्रेश रेट आणि 2,500 निट्स पीक ब्राईटनेस मिळते. यावर युजर्स व्हिडिओ पण प्ले करू शकतात. जर इनर स्क्रीन पाहता ही 6.8 इंचाची आहे ज्यात 1.5K रिजॉल्यूशन, 120Hz रिफ्रेश रेट आणि 3,000 निट्स पीक ब्राईटनेस देण्यात आले आहे.

प्रोसेसर: ऑनरच्या पहिल्या फ्लिप स्मार्टफोनला ब्रँड द्वारे क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 प्लस जेन 1 चिपसेटसह आणले गेले आहे. त्याचबरोबर कंपनीची सेल्फ-डेव्हलप C1+ RF एन्हांसमेंट चिप लावली आहे. याच्या मदतीने फोन प्रत्येक स्थितीमध्ये स्मूद परफॉर्मन्स देण्यासाठी सक्षम आहे. हेच नाही तर हीटिंगपासून वाचण्यासाठी अल्ट्राथिन लिक्विड कूलिंग सिस्टम पण आहे.

स्टोरेज: स्टोरेज आणि रॅम पाहता ब्रँडने डिव्हाईसला 12 जीबी पर्यंत रॅम आणि 1 टीबी पर्यंत इंटरनल स्टोरेजसह सादर केले आहे.

कॅमेरा: Honor Magic V Flip मध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. ज्यात OIS ला सपोर्ट असलेला 50MP Sony IMX906 मेन सेन्सर आणि 12MP अल्ट्रा-वाईड-अँगल लेन्स लावली आहे. तसेच, फोल्डेबल फोनमध्ये 50MP चा फ्रंट-फेसिंग सेल्फी कॅमेरा आहे.

बॅटरी: बॅटरीच्या बाबतीत नवीन Honor Magic V Flip स्मार्टफोन 4800mAh च्या मोठ्या बॅटरीसह आला आहे. ही मोठी बॅटरी फास्ट चार्ज करण्यासाठी 66 वॉट फास्ट चार्जिंगचा सपोर्टची सुविधा आहे.

ओएस: ऑपरेटिंग सिस्टम पाहता स्मार्टफोनला अँड्रॉईड 14 आधारित मॅजिक ओएस 8 सह सादर करण्यात आले आहे.

इतर: डिव्हाईस ड्युअल स्टीरियो स्पिकर सह येतो. यात साइड-माऊंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर आहे. याला 5 स्टार एसजीएस सर्टिफिकेशन पण मिळाले आहे. डिव्हाईसमध्ये ड्युअल सिम 5 जी, 4 जी, वायफाय, ब्लूटूथ सारखे अनेक पर्याय मिळतात.

डायमेंशन: Honor Magic V Flip ओपन केल्यावर 7.15 मिमी आणि फोल्ड झाल्यावर 14.89 मिमी आहे.

Honor Magic V Flip ची किंमत