ऑनरने आपल्या फोल्ड फोनचा विस्तार करत दोन नवीन आणि दमदार डिव्हाईस सादर केले आहेत. याला HONOR Magic V3 आणि HONOR Magic Vs3 नावाने होम मार्केट चीनमध्ये लाँच करण्यात आले आहे. दोन्ही मोबाईल आकर्षक लूक आणि स्पेसिफिकेशनसह आहेत. चला, पुढे किंमत आणि सर्व फिचर्स सविस्तर जाणून घेऊया.
HONOR Magic V3 चे स्पेसिफिकेशन
- इंटरनल डिस्प्ले: HONOR Magic V3 मध्ये 7.92 इंचाचा (2344 x 2156 पिक्सल) FHD+ OLED डिस्प्ले आहे. यावर 9.78:9 अॅस्पेक्ट रेश्यो, 120Hz रिफ्रेश रेटसह LTPO पॅनल, 4320Hz हाई-फ्रिक्वेंसी PWM आय प्रोटेक्शन, HDR10+, 1.07 बिलियन कलर्स, DCI-P3 वाइड कलर गॅमट, 5000 निट्स पर्यंत ब्राईटनेस, डॉल्बी व्हिजन आणि स्टाईलला सपोर्ट मिळतो.
- एक्सटर्नल डिस्प्ले: फोनमध्ये 6.43-इंचाचा (2376 x 1060 पिक्सल) FHD+ OLED LTPO पॅनल देण्यात आला आहे. यावर 20:9 अॅस्पेक्ट रेश्यो, 120Hz रिफ्रेश रेट, 4320Hz हाय-फ्रिक्वेंसी PWM आय प्रोटेक्शन, HDR10+, 1.07 बिलियन कलर, DCI-P3 वाईड कलर गॅमट, 5000 निट्स पर्यंत ब्राईटनेस सादर करण्यात आली आहे. फोनमध्ये राईनो ग्लास, मल्टी-टच, AI डिफोकस आय प्रोटेक्शन पण मिळते.
- प्रोसेसर: मोबाईलमध्ये जबरदस्त अनुभवसाठी ब्रँडने स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 चिपसेट आणि एड्रेनो 750 जीपीयू लावला आहे.
- स्टोरेज: स्टोरेजच्या बाबतीत 12 जीबी, 16 जीबी एलपीडीडीआर 5 एक्स रॅम आणि 256 जीबी, 512 जीबी तसेच 1 टीबी यूएफएस 4.0 इंटरनल स्टोरेज आहे.
- रिअर कॅमेरा: HONOR Magic V3 फोनमध्ये 50 एमपी प्रायमरी कॅमेरा ओआयएस, 1/1.56-इंचाचा सेन्सर, 50 एमपी पेरिस्कोप ओआयएस, 1/2.51-इंचाचा मोठा सेन्सर, 3.5x ऑप्टिकल झूम, 100x डिजिटल झूम आणि 40 MP अल्ट्रा-वाईड 112° अल्ट्रा-वाइड व्यूइंग अँगल लेन्स लावली आहे.
- फ्रंट कॅमेरा: सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी डिव्हाईसमध्ये 20MP चा 90° स्मार्ट वाईड-अँगल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.
- बॅटरी: HONOR Magic V3 मोबाईल 5150mAh ची मोठी बॅटरी आणि 66W वायर्ड, 50W वायरलेस सुपरचार्जला सपोर्ट करतो.
- इतर: फोनमध्ये ड्युअल सिम, 5G, 4G VoLTE, ड्युअल-सॅटेलाईट कम्युनिकेशन, Wi-Fi 7, ब्लूटूथ 5.3 सह पाणी आणि धूळीपासून वाचणारी IPX8 रेटिंग आहे.
HONOR Magic Vs3 चे स्पेसिफिकेशन
- इंटरनल डिस्प्ले: HONOR Magic Vs3 मध्ये 7.92-इंचाची (2344 x 2156 पिक्सल) FHD+ OLED LTPO स्क्रीन आहे. ही 9.78:9 अॅस्पेक्ट रेशियो, 120Hz रिफ्रेश रेट, 3840Hz हाय फ्रिक्वेंसी PWM आय प्रोटेक्शन, HDR10+, 1.07 बिलियन कलर्स, DCI-P3 वाईड कलर गॅमट, 1600 निट्स ब्राईटनेस, डॉल्बी व्हिजन आणि स्टाईलला सपोर्ट करते.
- एक्सटर्नल स्क्रीन: मोबाईलमध्ये 6.43-इंचाचा (2376 x 1060 पिक्सल) FHD+ OLED LTPO डिस्प्ले आहे. यावर 20:9 अॅस्पेक्ट रेशियो, 120Hz रिफ्रेश रेट, 3840Hz हाय फिरीक्वेंसी PWM आय प्रोटेक्शन, HDR10+, 1.07 बिलियन कलर्स, DCI-P3 वाइड कलर गॅमट, 2500 निट्स ब्राईटनेस मिळते.
- प्रोसेसर: HONOR Magic Vs3 मध्ये ब्रँडने परफॉरमेंससाठी क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेट दिली आहे. त्याचबरोबर ग्राफिक्ससाठी एड्रेनो 740 जीपीयू आहे.
- स्टोरेज: हा मोबाईल 12 जीबी, 16 जीबी एलपीडीडीआर 5 एक्स रॅम आणि 256 जीबी, 512 जीबी तसेच 1 टीबी यूएफएस 4.0 इंटरनल स्टोरेजसह आहे.
- रिअर कॅमेरा: HONOR Magic Vs3 मध्ये 50MP चा मेन सेन्सर OIS, 1/1.56-इंचाचा सेन्सर, 8MP पेरिस्कोप लेन्स OIS, 3.5x ऑप्टिकल झूम, 100x डिजिटल झूम आणि 40MP चा अल्ट्रा-वाइड 112° अल्ट्रा-वाइड व्यूइंग अँगल लेन्स लावण्यात आली आहे.
- फ्रंट कॅमेरा: यात 16MP चा 90° स्मार्ट वाईड-अँगल सेल्फी कॅमेरा मिळतो.
- बॅटरी: बॅटरीच्या बाबतीत हा मोबाईल 5000mAh बॅटरी, 66W वायर्ड, 50W वायरलेस सुपर चार्जसह येतो.
- इतर: फोनमध्ये ड्युअल सिम, 5G, 4G VoLTE, Wi-Fi 7, ब्लूटूथ 5.3 ची सुविधा आहे.
- ओएस: HONOR Magic V3 आणि HONOR Magic Vs3 दोन्ही मॉडेल Android 14 आधारित MagicOS 8.0.1 वर रन करतात.
HONOR Magic V3 ची किंमत
- HONOR Magic V3 तीन स्टोरेजमध्ये चीनमध्ये लाँच झाला आहे. याच्या 12GB+256GB मॉडेलची किंमत 8,999 yuan म्हणजे जवळपास 1,03,645 रुपये आहे.
- मिड मॉडेल 16GB+512GB मॉडेल 9,999 yuan जवळपास 1,15,160 रुपये आणि 16GB+1TB मेमरी ऑप्शन 10,999 yuan जवळपास 1,26,680 रुपयांना आहे.
- हा ब्लॅक, ग्रीन, रेड आणि व्हाईट सारख्या चार रंगामध्ये 19 जुलैपासून उपलब्ध होईल.
HONOR Magic Vs3 ची किंमत
- हा फोन पण तीन मेमरी व्हेरिएंटमध्ये आला आहे. याच्या बेस मॉडेल 12GB+256GB स्टोरेजची किंमत 6,999 युआन म्हणजे जवळपास 80,600 रुपये आहे.
- मिड मॉडेल 12GB+512GB ऑप्शन 7,699 युआन जवळपास 88,600 रुपये आणि 16GB+1TB फोन 8,699 युआन जवळपास 1,00,100 रुपयांना मिळेल.
- हा 19 जुलैपासून ब्लॅक, ग्रीन आणि व्हाईट सारख्या तीन कलरमध्ये सेल होईल.
