गेल्याच आठवड्यात बातमी आली होती कि ऑनर कमी रेंज मध्ये आपला नवीन फोन सादर करणार आहे आणि आज कंपनी ने हा फोन समोर आणला आहे. कंपनी ने ऑनर प्ले 8ए आणला आहे. हा कंपनीचा कमी रेंज मधील फोन आहे जो सध्या चीन मध्ये लॉन्च केला गेला आहे पण लवकरच भारतात पण येऊ शकतो. काही दिवसांपूर्वी हा फोन चीनी सर्टिफिकेशन साइट टेना वर दिसला होता आणि तेव्हा ऑनर 8ए असे नाव देण्यात आले होते पण आता कंपनी ने याच्या नावासोबतच किंमतीची पण माहिती दिली आहे.
ऑनर प्ले 8ए कमी रेंज मधील फोन आहे ज्यात तुम्हाला सिंगल कॅमेरा मिळेल. फोनची बॉडी प्लास्टिकची आहे आणि कंपनी ने मेटल फ्रेमचा वापर केला आहे. याचा आकर 156.28 x 73.5 x 8.0 एमएमए आहे तर वजन 150 ग्राम. कंपन ने हा ब्लॅक, ब्लू, गोल्ड आणि रेड सहित तीन रंगांत सादर केला आहे.
इतर स्पेसिफिकेशन पाहता हा फोन तुम्हाला आकर्षित करेल. यात 6.09-इंचाची स्क्रीन आहे आणि कंपनी ने वाटर ड्रॉप नॉचचा वापर आहे. फोन मध्ये तुम्हाला 19.5:9 आसपेक्ट रेशियो असलेली एचडी+ स्क्रीन मिळेल जिचे स्क्रीन रेजल्यूशन 720 x 1560 पिक्सल आहे. खास बाब अशी कि कंपनी ने हा हुआवईच्या किरीन चिपसेट ऐवजी मीडियाटेक प्रोसेसर सह आणला आहे. हा फोन हेलियो पी35 चिपसेट वर चालतो आणि फोन मध्ये 2.3गीगाहट्र्ज चा कोर्टेक्स ए53 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे.
ऑनर प्ले 8ए मध्ये तुम्हाला 3जीबी रॅम मिळेल. कंपनी ने हा दोन इंटरनल स्टोरेज सह सादर केला आहे. हा फोन 32जीबी आणि 64जीबी च्या स्टोरेज सह येतो. सोबत माइक्रोएसडी कार्ड सपोर्ट पण देण्यात आला आहे. कंपनी ने हा इमोशन यूआई 9.0 वर सादर केला आहे जो एंडरॉयड 9 पाई वर चालतो.
कॅमेरा बद्दल बोलायचे तर फोन मध्ये एफ/1.8 अपर्चर असलेला 13-मेगापिक्सलचा सिंगल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. जास्त अपर्चर लो लाइट मध्ये पण उपयोगी पडेल. फोन मध्ये पीडीएएफ सपोर्ट आहे जो फास्ट फोकस साठी प्रसिद्ध आहे. तसेच फ्रंट कॅमेरा 8-मेगापिक्सलचा आहे जो कंपनी ने एफ/2.0 अपर्चर सह सादर केला आहे.
ऑनर प्ले 8ए मध्ये 3,020 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. कंपनी ने फास्ट चार्जिंग ची माहिती दिली नाही पण हा 10 वॉट च्या चार्जरला सपोर्ट करतो. कनेक्टिविटी साठी वाईफाई, ब्लूटूथ आणि जीपीएस देण्यात आले आहेत. चांगली बाब अशी कि इतर ब्रँड या रेंज मध्ये माइक्रो यूएसबी पोर्ट देतात पण ऑनर ने यूएसबी टाइप सी सह हा सादर केला आहे. राहिली गोष्ट किंमतीची तर हा जवळपास 8,000 ते 9,000 रुपयांच्या आतील आहे.
