Home बातम्या एक्सक्लूसिव: 24एमपी पंच होल सेल्फी कॅमेरा 48एमपी रियर कॅमेर्‍या सह जानेवारी मध्ये भारतात येईल ऑनर ऑनर व्यू 20

एक्सक्लूसिव: 24एमपी पंच होल सेल्फी कॅमेरा 48एमपी रियर कॅमेर्‍या सह जानेवारी मध्ये भारतात येईल ऑनर ऑनर व्यू 20

नुकतीच हुआवई ब्रांड आॅनर ने आपला नवीन फोन व्यू 20 बद्दल माहिती दिली होती. कंपनी ने स्वतः सांगितले होते की हा फोन 48—मेगापिक्सल च्या कॅमेर्‍या सह येईल. तसेच फोनच्या डिजाइन आणि फूल व्यू डिस्प्लेची पण माहिती दिली आहे. चीन मध्ये हा फोन को 26 डिसेंबरला लॉन्च केला जाईल तर ग्लोबल लॉन्च 22 जानेवारीला आहे. यासाठी ऑनर ने पॅरिस मध्ये एका इवेंटचे आयोजन केले आहे. 91मोबाईल्सला या फोन बद्दल एक्सक्लूसिव माहिती मिळाली आहे कि कंपनी ग्लोबल लॉन्च सोबतच हा भारतात पण सादर करणार आहे.

91मोबाईल्सला माहिती इंडस्ट्री मधील एका आशा सोर्स कडून मिळाली आहे जो कंपनीचे इंडिया प्लान आणि डेवलमेंट खूप जवळून बघतो. यात काही स्पेसिफिकेशन्सचा पण खुलासा केला गेला आहे. माहिती अशी की ‘ऑनर व्यू 20 मध्ये 48—मेगापिक्सलच्या रियर कॅमेर्‍या सह 24—मेगापिक्सलचा पंच होल सेल्फी कॅमेरा असेल. हा फोन जानेवारीच्या शेवटी ग्लोबल लॉन्च सोबत भारतात येईल.’

तूम्हाला तर माहिती आहे ऑनर चा हा फोन चीन मध्ये वी20 नावाने लॉन्च होईल तर भारतासह इतर बाजारांत कंपनी हा ऑनर व्यू20 नावाने सादर करेल. नुकताच चीन मध्ये हुआवई ने या फोनचा डेमो दिला होता ज्यात डिजाइन आणि काही फीचर्सची माहिती देण्यात आली होती.

ऑनर व्यू20 हुआवई च्या किरीन 980 चिपसेट वर सादर केला जाईल. कंपनीचा हा नवीन प्रोसेसर आहे जो एआई कॅपेबिलिटी सह येतो. यासोबत नवीन क्लाउड स्टोरेज टेक्नोलॉजी बद्दल सांगण्यात आले होते. कंपनी ने अशी माहिती दिली आहे की फोन फुल बेजल लेस डिजाइन मध्ये उपलब्ध होईल.

लीक मधून आलेल्या माहितीनुसार कंपनी ऑनर व्यू 20 एंडरॉयड 9 पाई सह सादर करू शकते आणि या फोन मध्ये तुम्हाला 6जीबी रॅम सोबत 128जीबी मेमरी मिळेल.