Home बातम्या Honor X7c 4G चे स्पेसिफिकेशन, डिझाईन, कलर आले समोर, जाणून घ्या माहिती

Honor X7c 4G चे स्पेसिफिकेशन, डिझाईन, कलर आले समोर, जाणून घ्या माहिती

ऑनर येत्या काही आठवड्यांमध्ये आपली एक्स 7 सी सीरीज लाँच करू शकते. त्याचबरोबर Honor X7c 4G आणि 5G मॉडेल येण्याची शक्यता आहे. हा मोबाईल याआधी काही सर्टिफिकेशन साईट वर पण दिसला आहे. परंतु ब्रँडने आतापर्यंत कोणतीही अधिकृत पुष्टी केली नाही, मात्र 91 मोबाईलला डिव्हाईसच्या 4 जी ऑप्शनची वैशिष्ट्ये, कलर पर्याय आणि डिझाईनची माहिती मिळाली आहे. चला, पुढे याची माहिती जाणून घेऊया.

Honor X7c 4G कलर, डिझाईन आणि लाँच टाईमलाईन (संभाव्य)

आमच्याकडे इंडस्ट्री सूत्रांकडून Honor X7c 4G ची ग्लोबल मॉडेलची माहिती समोर आली आहे.
Honor X7c 4G तीन कलर ऑप्शनमध्ये येऊ शकतो. ज्यात ब्लॅक, व्हाईट आणि ग्रीन असू शकतात. व्हाईट आणि ग्रीन कलरमध्ये टेक्सचर्ड बॅक पॅनल मिळू शकतो. डिव्हाईसमध्ये फ्लॅट एज आणि मागील बाजूस चौकोर कॅमेरा मॉड्यूल दिसत आहे. तसेच, फ्रंटला पंच-होल डिस्प्ले आहे.

Honor X7c 4G फोन लवकरच लाँच होण्याची शक्यता आहे. तसेच पूर्व मॉडेल Honor X7b 4G डिसेंबर 2023 मध्ये रिलीज झाला होता आणि 5G मॉडेल यावर्षी एप्रिलमध्ये आला होता.

Honor X7c 4G चे स्पेसिफिकेशन

डिस्प्ले: Honor X7c 4G मध्ये 6.77-इंचाचा IPS डिस्प्ले मिळण्याची शक्यता आहे. यावर 1610×720 पिक्सल रिजॉल्यूशन, 120Hz रिफ्रेश रेट, 261ppi आणि 20.1:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोला सपोर्ट दिला जाऊ शकतो.

प्रोसेसर: आगामी ऑनर स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 685 चिपसेट लावला जाणार असल्याची माहिती सांगण्यात आली आहे.

स्टोरेज आणि रॅम: स्पीडसाठी डिव्हाईसमध्ये 8GB रॅम आणि स्पेससाठी 256GB इंटरनल स्टोरेज असू शकते.

कॅमेरा: कॅमेराच्या बाबतीत Honor X7c 4G मध्ये रिअर पॅनलवर 108MP चा प्रायमरी सेन्सर आणि 2MP चा सेकंडरी सेन्सर मिळू शकतो. तसेच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8MP चा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो.

बॅटरी आणि चार्जिंग: मोबाईलमध्ये पावर बॅकअपसाठी ब्रँड द्वारे 35W फास्ट चार्जिंगला सपोर्टसह 5,200mAh ची मोठी बॅटरी दिली जाऊ शकते.

ओएस: हा फोन MagicOS 8.0 सह अँड्रॉईड 14 वर आधारित ठेवला जाऊ शकतो.

इतर: Honor X7c 4G मध्ये साईड-माऊंटेड फिंगरप्रिंट सेन्सर, ड्युअल नॅनो सिम सपोर्ट, मायक्रोएसडी कार्ड स्लॉट, NFC, ब्लूटूथ 5.0, वाय-फाय 5, USB टाईप-सी आणि 3.5mm ऑडियो जॅक सारखे फिचर्स मिळू शकतात. तर पाणी आणि धूळीपासून सुरक्षेसाठी IP64 रेटिंग दिली जाऊ शकते.

वजन आणि डायमेंशन: लीकनुसार हा डिव्हाईस 166.9 x 76.8 x 8.1 मिमी आणि 191 ग्रॅमचा सांगण्यात आलं आहे.