India vs West Indies सीरीजची सुरुवात 12 जुलैपासून होणार आहे. टीम इंडिया, विंडीज टीम सोबत ह्या दौऱ्यावर 2 टेस्ट, 3 वनडे आणि 5 टी20 खेळेल. त्यामुळे हे सामने टीव्ही व्यतिरिक्त ऑनलाइन कोणत्या प्लॅटफॉर्मवर बघता येतील हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल. ह्या आर्टिकलमध्ये भारत आणि वेस्टइंडीजचे सामने टीव्ही आणि ऑनलाइन कुठे बघायचे हे आम्ही सांगणार आहोत.
भारत आणि वेस्टइंडीज सीरिज ऑनलाइन स्ट्रीमिंग
वेस्टइंडीजचा 2023 मधील भारत दौरा जिओ सिनेमावर मोफत लाइव्ह-स्ट्रीम केला जाईल. Viacom18 सपोर्टेड प्लॅटफॉर्म सात भाषांमध्ये टेस्ट, वनडे आणि टी20 सामने दर्शकांना दाखवेल, ज्यात इंग्रजी, हिंदी, भोजपुरी, पंजाबी, तामिळ, तेलुगु आणि कन्नडचा समावेश असेल. तसेच मॅच फीड वेगवेगळ्या कॅमेरा अँगलवरून बघता येईल.
India vs West Indies ची पहिली टेस्ट मॅच टाइम
- तारीख: 12 ते 16 जुलै
- वेळ: 07:30 pm (IST)
- ठिकाण: Windsor Park, Roseau, Dominica
दुसरी कसोटी 20 जुलैला पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद मध्ये होईल. तर तीन वनडे सीरीजची सुरुवात 22 जुलैपासून होईल. त्यानंतर 24 जुलैला दुसरी वनडे आणि 27 जुलैला तिसरी वनडे खेळवली जाईल. तसेच पाच सामान्यांची टी20 सीरीज 29 जुलैला सुरु होईल.
अन्य प्लॅटफॉर्म
जिओ सिनेमा व्यतिरिक, भारत विरुद्ध वेस्टइंडीज सीरीजचे सामने फॅनकोडवर पाहता येतील. फॅनकोड प्ले स्टोर आणि अॅप स्टोरवर अॅप स्वरूपात उपलब्ध आहे. तसेच फॅनकोडची वेबसाइट देखली आहे. परंतु इथे सामने बघण्यासाठी युजर्सना सदस्यत्व घ्यावं लागेल.
89 रुपयांचा टूर पास : ह्या मेंबरशिपमध्ये संपूर्ण IND vs WI टूर्नामेंटचा आनंद घेता येईल. ज्यात दोन टेस्ट, तीन वनडे आणि पाच टी20 सामने आहेत.
199 रुपयांचा लाइव्हस्ट्रीम पास : 199 रुपयांचा पास IND विरुद्ध WI सीरीज, व्हिटॅलिटी ब्लास्ट, SL विरुद्ध PAK सीरीज, महिला अॅशेज आणि इतर टूर्नामेंटसह लाइव्ह क्रिकेट कंटेंटचा अॅक्सेस देईल.
699 रुपयांचा लाइव्हस्ट्रीम पास : 699 रुपयांचा लाइव्हस्ट्रीम पास मंथली पासचे फायदे देतो परंतु वैधता एक वर्षाची आहे.
टीव्हीवर कुठे पाहायचं
क्रिकेटच्या चाहत्यांना टीव्हीवर दूरदर्शन चॅनेल जसे की डीडी स्पोर्ट्स, डीडी बांग्ला, डीडी यादगिरी, डीडी सप्तगिरी, डीडी चंदना आणि डीडी पोधिगई वर ही सीरिज बघता येईल.
