Home बातम्या हुआवई घेऊन येत आहे आपला सर्वात स्वस्त 5G फोन Huawei Enjoy Z

हुआवई घेऊन येत आहे आपला सर्वात स्वस्त 5G फोन Huawei Enjoy Z

Huawei ने मार्च मध्ये आपल्या फ्लॅगशिप अंतर्गत ‘पी40 सीरीज’ सादर केली होती. या सीरीज अंतर्गत कंपनीने Huawei P40, Huawei P40 Pro आणि Huawei P40 Pro+ स्मार्टफोन लॉन्च केले होते. हे तिन्ही डिवाईस हुआवई ने 5जी सपोर्ट सह बाजारात आणले होते जे येत्या काही दिवसांत भारतात पण सादर केला जाऊ शकतात. हुआवई पी सीरीजच्या इंडिया लॉन्चची माहिती अजूनतरी स्पष्ट झाली नाही पण याआधी कंपनीने आपल्या अजून एका नवीन 5जी फोन समोर आणला आहे. हुआवईने घोषणा केली आहे कि कंपनी येत्या 24 मे ला टेक बाजारात आपला आता पर्यंतचा सर्वात स्वस्त 5G फोन Huawei Enjoy Z लॉन्च करणार आहे.

Huawei Enjoy Z येत्या 24 मे ला इंटरनेशनल मार्केट मध्ये लॉन्च केला जाईल. हा फोन हुआवईचा ‘अफार्डेबल 5G फोन’ असल्याचे बोलले जात आहे, म्हणजे हा डिवाईस कंपनी द्वारे आता पर्यंत लॉन्च केल्या गेलेल्या 5जी स्मार्टफोन्स मध्ये सर्वात स्वस्त असेल. कंपनी 24 मे ला हा फोन चीनी बाजारात आणेल, त्यानंतर हुआवई इंजॉय झेड इतर बाजारांमध्ये येईल. लॉन्च डेट व्यतिरिक्त चीनी माइक्रोब्लागिंग साइट वेईबो वर या फोनची रेंडर ईमेज पण शेयर करण्यात आली आहे.

असा असेल लुक

हुआवई इन्जॉय झेड चा फोटो समोर आल्यामुळे याच्या लुक व डिजाईनचा पण खुलासा झाला आहे. फोटो मध्ये फोन बेजल लेस वॉटरड्रॉप नॉच स्टाईल सह दाखवण्यात आला आहे. फोनच्या फ्रंट पॅनल वर बेजल लेस डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याच्या वर ‘यू’ शेप नॉच आहे तसेच खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट देण्यात आलेला आहे. फोनच्या बॅक पॅनल वर क्वॉड रियर कॅमेरा देण्यात आलेला आहे जो उजवीकडे चौकोनी आकारात आहे. वेईबो पोस्टनुसार Huawei Enjoy Z मध्ये 48 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेंसर असेल.

या कॅमेरा सेटअप मध्ये तीन कॅमेरा लेंस आणि अजून एक सेंसर वर्टिकल शेप मध्ये आहे. बाजूला फ्लॅश लाईट आणि लेंस डिटेल लिहिण्यात आले आहेत. फोटो मध्ये Huawei Enjoy Z च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर दिसत नाही. फोनच्या उजव्या पॅनल वर वॉल्यूम रॉकर आहे ज्याच्या खाली पावर बटण आहे. या बटणाच्या आकारावरून अंदाज लावला जात आहे कि हा फिंगरप्रिंट सेंसर इम्बेडेड असेल. लीक झालेल्या फोटोज मध्ये Huawei Enjoy Z तीन रंगात दाखवण्यात आला आहे.