Home बातम्या Huawei Mate 40 Pro ताकदवान प्रोसेसर आणि 8GB रॅम सह झाला लिस्ट, 22 ऑक्टोबरला होईल लॉन्च

Huawei Mate 40 Pro ताकदवान प्रोसेसर आणि 8GB रॅम सह झाला लिस्ट, 22 ऑक्टोबरला होईल लॉन्च

Huawei Mate 40 सीरीज बद्दल अनेक दिवसांपासून माहिती समोर येत आहे. अलीकडेच असे समजले होते कि 22 ऑक्टोबरला हुवावेची नवीन सीरीज सादर केली जाईल. हुवावे कंज्यूमर बिजनेस सीईओ आणि हुवावे एग्जिक्यूटिव डायरेक्टर Richard Yu ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून लॉन्च डेट सांगितली होती. या सीरीज मध्ये Huawei Mate 40, Huawei Mate 40 Pro आणि Huawei Mate 40 Pro+ लॉन्च केला जाऊ शकतात, जे आतापर्यंत अनेक सर्टिफिकेशन साइट वर दिसले आहेत. प्रो मॉडेलच्या लीक रेंडर्स मध्ये समजले होते कि हा फोन डुअल-पंच सेल्फी कॅमेरा आणि क्वाड कॅमेरा सेटअप सह येईल. तसेच आता Huawei Mate 40 Pro गीकबेंच वर स्पॉट केला गेला आहे, तिथे फोनच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली आहे.

गीकबेंच वर हुवावे मेट 40 प्रो मॉडेल नंबर NOH-NX9 सह स्पॉट केला गेला आहे. तसेच या मॉडेल नंबर सह फोनला काही दिवसांपूर्वी इंडोनेशिया टेलिकॉमच्या TÜV SÜD वर सर्टिफिकेशन मिळाले होते.

Huawei Mate 40 Pro चे स्पेसिफिकेशन्स

Geekbench लिस्टिंग नुसार Mate 40 Pro नव्या Kirin 9000 चिपसेट वर सादर केला जाईल. लिस्टिंग मध्ये चिपसेटच्या नावाचा उल्लेख नाही. पण लिस्टिंग मध्ये सोर्स कोड वर Mali-G78 दिसले आहे जो 5nm प्रोसेस सह लिस्ट आहे. Kirin 9000 कंपनीचा पहिला 5nm SoC असेल जो ब्लिट-इन 5G मोडेम सह येऊ शकतो. बेंचमार्किंग साइट वर समोर आले आहे कि फोन मध्ये 8GB रॅम असेल. आशा आहे कि फोन कमी रॅम मध्ये पण येऊ शकतो.

Huawei Mate 40 Pro अँड्रॉइड 10 वर सादर केला जाऊ शकतो. यात हुवावेची ऍपगॅलरी ऍपस्टोर मिळेल. फोनला बेंचमार्किंग साइट वर सिंगल-कोर मध्ये 1020 आणि मल्टी कोर मध्ये 3710 स्कोर मिळाला आहे जे फ्लॅगशिप लेवल आहेत.

Huawei Mate 40 Pro च्या किंमतीसाठी आणि फुल स्पेसिफिकेशन्ससाठी आपल्याला 22 ऑक्टोबर पर्यंतची वाट बघावी लागेल. पण काही दिवसांपूर्वी आलेल्या लीकनुसार या फोन मध्ये मागे वर्तुळाकार क्वाड कॅमेरा सेटअप असू शकतो, ज्यात एक 108MP सेन्सर असेल. तसेच Mate 40 सीरीज 66W फास्ट चार्जिंग सह सादर केला जाऊ शकतो.

ऑगस्ट मध्ये MIIT सर्टिफिकेशन वर हुवावे मेट 40 सीरीजच्या तीन मॉडेलची माहिती आली होती. माहितीमसूर पहिला फोन vanilla Huawei Mate 40 ज्याचे कोडनेम Ocean होते आणि मॉडेल नंबर OCE-AN00, दुसरा फोन Huawei Mate 40 Pro असू शकतो, ज्याचे कोडनेम Noah आणि मॉडेल नंबर NOH-AN00 होता. तिसरा व सीरीजचा प्रीमियम फोन कथितरित्या Mate 40 Pro+ असू शकतो, ज्याचा मॉडेल नंबर NOP-AN00 होता.