Huawei ने गेल्या महिन्यात अंर्तराष्ट्रीय मंचावर आपली स्मार्टफोन सिरीज वाढवत पी सीरीजचा विस्तार केला होता. कंपनीने पी30 सीरीज सादर केली होती. या सीरीज अंतर्गत हुआवई पी30, पी30 प्रो आणि प्री30 लाइट लॉन्च करण्यात आले होते. Huawei P30 सीरीजच्या ग्लोबल लॉन्च नंतर काही दिवसांनी आज हि स्मार्टफोन सीरीज भारतात पण आली आहे. हुआवई ने पी30 सीरीज भारतात आणत सीरीजचा सर्वात पावरफुल स्मार्टफोन पी30 प्रो लॉन्च केला आहे. या फोन सोबत पी30 लाइट पण बाजारात आला आहे. हुआवई पी30 प्रो दमदार स्पेसिफिकेशन्स सोबतच आपल्या कॅमेरा सेग्मेंट मध्ये पण हिट झाला आहे आणि आता हा भारतीय बाजारात पण प्रसिद्ध कॅमेरा फोन्सना चांगली टक्कर देणार आहे.
जबरदस्त कॅमेरा
Huawei P30 Pro ची सर्वात मोठी ताकद फोनचा कॅमेरा सेग्मेंटच आहे. हा फोन क्वॉड रियर कॅमेरा सेटअप सह येतो, म्हणजे फोनच्या बॅक पॅनल वर 4 रियर कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत. Huawei ने हा फोन लेईका कॅमेरा सेंसर सह आणला आहे. फोनच्या बॅक पॅनल वर 40-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे जो एफ/1.6 अपर्चरला सपोर्ट करतो. तसेच P30 Pro मध्ये एफ/2.2 अपर्चर वाला 20-मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड एंगल लेंस आणि एफ/3.4 अपर्चर वाला 8-मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस देण्यात आली आहे.
P30 Pro च्या बॅक पॅनल वर हुआवई टाईम-ऑफ-फ्लाइट (टीओएफ) सेंसर देण्यात आला आहे जो फोटो क्लिक करताना ऑब्जेक्ट व बॅकग्राउंड अंतर बघून ब्लर करतो. फोनचा रियर कॅमेरा सेटअप एआई ईमेज स्टेबलाइजेशन टेक्नॉलॉजी सोबत आटो फोकस टेक्नॉलॉजी ने सुसज्ज करण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी हुआवई पी30 प्रो च्या फ्रंट पॅनल वर एफ/2.0 अपर्चर वाला 32-मेगापिक्सलचा कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे.
हुआवई पी30 प्रो लुक
Huawei ने हा फोन को ट्रेंड मध्ये चल रही वॉटरड्राप नॉच डिस्प्ले वर सादर केला आहे. फोनच्या तीन कडा पूर्णपणे बेजल लेस आहेत तर खाली बारीक बॉडी पार्ट देण्यात आला आहे. हुआवई पी30 प्रो च्या बॅक पॅनल वर क्वॉड रियर कॅमेरा देण्यात आला आहे जो फोनच्या डाव्या बाजूला वर्टिकल शेप मध्ये आहे. या कॅमेरा सेटअपच्या बाजूला फ्लॅश लाईट देण्यात आली आहे. हा फोन इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करतो. बॅक पॅनल वर खालच्या बाजूला हुआवईची ब्रॅंडिंग देण्यात आली आहे. Huawei P30 Pro च्या उजव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर आणि पावर बटण देण्यात आला आहे तसेच डाव्या पॅनल वर सिम ट्रे आहे. तसेच्या फोनच्या खालच्या पॅनल वर यूएसबी टाईप सी पोर्ट आहे.
हुआवई पी30 प्रो स्पेसिफिकेशन्स
स्पेसिफिकेशन्स पाहता Huawei P30 Pro 1080 x 2340 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.47-इंचाच्या ओएलईडी फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनच्या डिस्प्ले मधेच इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर आहे. कंपनीने हा फोन एंडरॉयडच्या सर्वात लेटेस्ट ओएस एंडरॉयड 9 पाई आधारित ईएमयूआई 9 वर सादर केला आहे जो आक्टा-कोर प्रोसेसर सह 7एनएम ड्यूल-एनयूपी टेक्नॉलॉजी सपोर्ट करणाऱ्या हुआवईच्या सर्वात पावरफुल किरीन 980 चिपसेट वर चालतो.
Huawei P30 Pro भारतात 8जीबी रॅम वर लॉन्च करण्यात आला आहे. हा फोन 256जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. हा फोन आईपी68 रेटिड आहे जो पी30 प्रो ला पाणी व धुळीपासून वाचवतो. ब्लूटूथ व एनएफसी सारख्या कनेक्टिविटी फीचर्स सोबत सिक्योरिटी साठी Huawei P30 Pro मध्ये फेस अनलॉक टेक्नॉलॉजी तसेच इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. तसेच पावर बॅकअप साठी Huawei P30 Pro मध्ये यूएसबी टाईप सी पोर्ट सह 4,200एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
किंमत पाहता हुआवई पी30 प्रो भारतात 71,990 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. हुआवई पी30 प्रो शॉपिंग साइट अमेझॉन इंडिया वरून विकत घेता येईल. विशेष म्हणजे हुआवई पी30 प्रो च्या खरेदीवर फक्त 2,000 रुपये जास्त देऊन 15,990 रुपयांचा हुआवई जीटी वॉच पण मिळवता येईल.
