Huawei ने गेल्या महिन्यात पॅरिस मध्ये आयोजित इवेंट मधून आपले फ्लॅगशिप फोन्स लॉन्च केले होते, ज्यात पी30 आणि पी30 प्रो यांचा समावेश होता. तसेच लॉन्च नंतर निश्चित झाले होते कि कंपनी P30 Pro आणि P30 लवकरच भारतात पण लॉन्च करणार आहे. यासाठी ई-कॉमर्स वेबसाइट अमेझॉन वर प्रोडक्ट पेज लाइव हो गया आहे. अमेझॉन वर लाइव पेज मध्ये सध्या किंमत आणि उपलब्धतेची माहिती समोर आलेली नाही. आम्ही आज तुम्हाला अशी 5 कारणे सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही फ्लॅगशिप डिवाइस P30 Pro ची वाट बघितली पाहिजे.
या फ्लॅगशिप फोनची खासियत सांगण्याआधी तुम्हाला सांगू इच्छितो कि कंपनी द्वारा हा फोन भारतात 15 एप्रिलच्या आधी सादर केला जाऊ शकतो. हि माहिती अधिकृत नाही. पण लीक्स वर पाहता तुम्हाला फोन साठी जास्त वाट बघावी लागणार नाही.
कॅमेरा
सर्वात आधी हुआवई पी30 प्रो च्या कॅमेऱ्याबद्दल बोलूया. या फोनची सर्वात मोठी खासियत यात मागे देण्यात आलेले चार कॅमेरे आहेत जे एक शानदार फोटो एक्सपीरियंस देतात. डीएक्सओ मार्क रँकिंग्स मध्ये या फोनला टॉप रँकिंग देण्यात आली आहे. ता रँकिंग मध्ये Huawei P30 Pro ला 112 गुण मिळाले आहेत. आपल्या कॅमेऱ्याच्या जीवावर हा फोन फोटो रँकिंग मध्ये प्रथम क्रमांकावर आला आहे. डीएक्सओमार्क एक अशी संस्था आहे जी कॅमेऱ्यासाठी फोन्सना रँक देते. फोन मधील कॅमेऱ्यांच्या बद्दल बोलायचे तर यात 40-मेगापिक्सलचा वाइड ऍंगल सेंसर, 20-मेगापिक्सल अल्ट्रावाइड ऍंगल सेकेंडरी सेंसर, 8 मेगापिक्सल टेली फोट कॅमेरा सेंसर आणि शेवटी टाइम-ऑफ-फ्लाइट (टीओएफ) डेफ्थ सेंसर देण्यात आला आहे.
हे देखील वाचा: पुन्हा सुरु होत आहे शाओमी ‘मी फेस्टिवल’, 1 रुपायात मिळेल रेडमी नोट 7 प्रो आणि मी एलईडी टीवी
शानदार डिस्प्ले
फोनच्या डिस्प्ले बद्दल बोलायचे तर फोन मध्ये खूप मोठा डिस्प्ले आहे. एक वेळ होती जेव्हा इतका मोठा डिस्प्ले असलेला हँडसेट टॅब व फॅबलेट कॅटगरी मध्ये येत होता. पण नॉच आणि पंच होल डिस्प्ले आल्यामुळे बेजल्स कमी झाले आहेत आणि इससे स्क्रीनचा रेशिओ जास्त मिळतो. कंपनी ने P30 Pro मध्ये 6.47-इंचाचा ओएलईडी फुलएचडी+ डिस्प्ले दिला आहे, ज्याचे रेजोल्यूशन (1080x 2340 पिक्सल) आहे.
आकर्षक डिजाइन
डिजाइन बद्दल बोलायचे तर फोन कंपनी ने वाटर ड्रॉप नॉच सह सादर केला आहे. यामुळे डिवाइसला शानदार लुक मिळतो. तसेच फोनच्या वाटर ड्रॉप नॉच मध्ये फ्रंट कॅमेरा सेल्फी साठी आहे. त्याचबरोबर फोनच्या मागे वर्टिकल शेप मध्ये चार कॅमेरा आहेत.
हे देखील वाचा: 48-एमपी ट्रिपल कॅमेरा आणि पंच-होल डिस्प्ले सह सॅमसंगला टक्कर देण्यास आला नोकिया एक्स71
रॅम व स्टोरेज
फोन मध्ये 6जीबी रॅम+128जीबी इंटरनल स्टोरेज वेरियंट, 8जीबी रॅम+256जीबी इंटरनल स्टोरेज वेरियंट आणि 8जीबी रॅम+512जीबी स्टोरेज वेरियंट सादर केले गेले आहेत. भारतात हे तिन्ही वेरियंट लॉन्च केले जातील किंवा नाही याबाबत माहिती मिळालेली नाही. फ्लॅगशिप फोन पाहता 8जीबी रॅम+512जीबी स्टोरेज वेरियंट दमदार असेल.
दमदार प्रोसेसर आणि बॅटरी
Huawei P30 Pro स्मार्टफोन मध्ये कंपनी ने लेटेस्ट किरिन 980 एसओसी दिला आहे जो 7एनएम चिपसेट जो ड्यूल-एनयूपी ला सपोर्ट करतो. हा प्रोसेसर कंपनीचाच आहे जो एक फ्लॅगशिप आहे. अलीकडेच कंपनी ने आपल्या अनेक फ्लॅगशिप फोन मध्ये या प्रोसेसरचा वापर केला आहे. प्रोसेसरच्या मदतीने तुम्ही मल्टीटास्किंग करू शकता. फोन मध्ये 4,200एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. कंपनी म्हणते कि फोनची बॅटरी 30 मिनिटांत 70 टक्के चार्ज होऊ शकते.
