Home बातम्या Huawei Y6p आणि Huawei Y5p प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध, 5000एमएएच बॅटरी सह आहे ट्रिपल कॅमेरा, बघा किंमत

Huawei Y6p आणि Huawei Y5p प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध, 5000एमएएच बॅटरी सह आहे ट्रिपल कॅमेरा, बघा किंमत

Huawei सध्या फुलफॉर्म मध्ये दिसत आहे. कंपनी भारतात आपल्या ‘वाय सीरीज’ चा Huawei Y9s स्मार्टफोन लॉन्च करणार आहे जो अमेझॉन इंडिया वर पण लिस्ट झाला आहे. या फोन व्यतिरिक कंपनीने अजून एकआणि नवीन फोन Huawei Y8s यूरोपियन वेबसाइट वर ऑफिशियल केला आहे. तर दुसरीकडे कालच कंपनीच्या दोन नवीन फोन्सचे लीक समोर आले होते ज्यांची नावे Huawei Y6P आणि Huawei Y5P अशी आहेत. आज हुआवईने आज या दोन्ही स्मार्टफोन्सची किंमत समोर आली आहे.

हुआवईने Huawei Y6P आणि Huawei Y5P रोमानिया मध्ये ऑफिशियल केले आहेत. कंपनीने या दोन्ही स्मार्टफोन्सच्या किंमती सादर केली आहे त्यानंतर हे डिवायस तिथे प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध झाले आहेत. हुआवई वाय6पी पाहता हा फोन रोमानिया मध्ये RON 799 म्हणजे जवळपास 13,500 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे जो Black, Green आणि Purple कलर मध्ये सेलसाठी उपलब्ध होईल. तसेच हुआवई वाय5पी RON 599 म्हणजे जवळपास 10,000 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे जो Black, mint आणि blue कलर मध्ये सेलसाठी उपलब्ध होईल.

Huawei Y6p

हुआवई वाय6पी 6.3 इंचाच्या एचडी+ एलसीडी वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे. लीक मध्ये शेयर झालेल्या फोटो मध्ये फोनचे डायमेंशन 159.07 x 74.06 x 9.04एमएम तसेच फोनचे वजन 185 ग्राम असल्याचे सांगण्यात आले आहे. Huawei Y6P एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 10 आधारित ईएमयूआई 10.1 वर सादर केला गेला आहे जो आक्टाकोर मीडियाटेक हीलियो पी22 चिपसेट वर चालतो.

हुआवईने हा फोन 3 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वर लॉन्च केला आहे. Huawei Y6P ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात 13 मेगापिक्सलच्या प्राइमरी सेंसर सह 5 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड लेंस आणि 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर देण्यात आला आहे. सेल्फीसाठी हा फोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअपसाठी हुआवई वाय6पी मध्ये 5,000एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे.

Huawei Y5p

हुआवई वाय5पी 5.45 इंचाच्या टीएफटी एलसीडी वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे. या फोन मध्ये रुंद बेजल्स असलेली स्क्रीन आहे ज्यात कोणतीही नॉच नाही. तसेच फोनचे डायमेंशन 146.5 x 70.94 x 8.35एमएम तसेच फोनचे वजन 144 ग्राम आहे. Huawei Y5P एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 10 आधारित ईएमयूआई 10.1 वर सादर केला गेला आहे जो आक्टाकोर मीडियाटेक हीलियो पी22 चिपसेट वर चालतो.

हुआवईने हा फोन 2 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज वर लॉन्च केला आहे. Huawei Y5P सिंगल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात फ्लॅश लाईट सह 8 मेगापिक्सलचा सेंसर देण्यात आला आहे. सेल्फीसाठी हा फोन 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी हुआवई वाय5पी मध्ये 3,020एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

Source