शाओमी ने थोड्याच काळात ज्या वेगाने भारताच्या मोबाईल बाजारावर आपला कब्जा केला आहे त्या वेगाने क्वचितच एखादा ब्रँड इंडियन यूजर्सना आवडला असेल. अनेक वर्षे भारताच्या मोबाईल बाजारावर राज्य करणाऱ्या सॅमसंग ला पण या चीनी कंपनी ने मागे टाकले आहे. शाओमी द्वारा लॉन्च केला जाणारा जवळपास प्रत्येक स्मार्टफोन देशात सेल चे नवीन रेकॉर्ड बनवतो. आपले हे यश शाओमी ने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. शाओमी लागोपाठ पाचव्यांदा देशातील सर्वात जास्त विकला जाणारा स्मार्टफोन ब्रँड बनला आहे.
इंडियन स्मार्टफोन बाजारा संबंधित आकड्यांसह प्रसिद्ध फर्म आईडीसी ने एक रिपोर्ट शेयर केला आहे. आपल्या या ताजा रिपोर्ट मध्ये आईडीसी ने देशातील मागील तिमाहीचे आकंडे शेयर केले आहेत ज्यात सांगण्यात आले आहे कि कोणत्या कंपनी व कोणत्या ब्रँड ने भारतीय मोबाईल बाजारातील किती प्रतिशत शेयर मिळवला आहे. या रिपोर्ट नुसार शओमी ने सॅमसंग समेत इतर सर्व ब्रँड्सना मागे टाकत नंबर वनची पोजिशन मिळवली आहे. एकट्या शाओमी ने इंडियन स्मार्टफोन बाजाराच्या 27.3 प्रतिशत हिस्स्यावर आपला कब्जा केला आहे.
#Xiaomi: No. 1 smartphone brand in India for the 5th consecutive quarter – latest @IDC report! ?
Thank you all for your love & support. Mi Fans, you have being our strength from the beginning! ?#1SmartphoneBrand (1/2) pic.twitter.com/cunTSRZInS
— Manu Kumar Jain (@manukumarjain) November 16, 2018
शाओमी या शेयर सह लागोपाठ पाचव्या क्वॉटर मध्ये पण नंबर एक बनली आहे. म्हणजे आईडीसी च्या रिपोर्ट अनुसार लागोपाठ 5 तिमाही (15 महीने) पासून शाओमी इंडियन स्मार्टफोन मार्केट मध्ये सर्वात पुढे आहे. नवीन रिपोर्ट मध्ये शाओमी नंतर सॅमसंगला दुसरे स्थान मिळाले आहे. गेल्या तिमाहीत सॅमसंगच्या वाट्याला 22.6 प्रतिशत मार्केट शेयर आला आहे. तसेच 10.5 प्रतिशत शेयर सह वीवो तिसऱ्या नंबर वर आहे.
टॉप 5 मध्ये आपली जागा बनवत इंडियन स्मार्टफोन कंपनी माइक्रोमॅक्स चौथ्या नंबर आहे. मागील तिमाहीत माइक्रोमॅक्स ने ओपो ला मागे टाकत 6.9 प्रतिशत मार्केट शेयर मिळवला आहे. तर 6.7 प्रतिशत शेयर्स सह ओपो पाचव्या पोजिशन वर आली आहे. या रिपोर्ट वरून समजले आहे कि भारतात सर्वात जास्त स्मार्टफोन विकणाऱ्या 5 कंपन्यांपैकी 3 कंपन्या चीनच्या आहेत. या चीनी कंपन्यांनी देशातील जवळपास 45 प्रतिशत स्मार्टफोन बाजरावर कब्जा केला आहे.
