Home बातम्या जियो च्या 8जीबी फ्री डाटा ला टक्कर देण्यासाठी आयडिया देत आहे 10 जीबी 4जी डाटा मोफत, जाणून घ्या कसा घ्याल फायदा

जियो च्या 8जीबी फ्री डाटा ला टक्कर देण्यासाठी आयडिया देत आहे 10 जीबी 4जी डाटा मोफत, जाणून घ्या कसा घ्याल फायदा

​रिलायंस जियो कडून बातमी आली होती की आपल्या यूजर्सना भेट म्हणून कंपनी 8जीबी 4जी डाटा फ्री देत आहे. तर आता जियो नंतर आयडिया कडून पण मोफत डाटा ची सूचना येत आहे. आयडिया आपल्या कस्टमर्सना 4जी वोएलटीई सर्विस चा फायदा देण्यासह 10जीबी 4जी इंटरनेट डाटा एकदम मोफत देत आहे. जियो कडून मिळणारा 8जीबी डाटा मध्ये 4 दिवसांची वॅलिडिटी दिली जात आहे तर आयडिया कडून मिळणारा 10जीबी डाटा कोणत्याही वॅलिडिटी वीना मिळतो.

आयडिया ने देशातील 6 मोठ्या टेलीकॉम सर्किल्स मध्ये आपली 4जी वोएलटीई सर्विस लॉन्च केली आहे. आज म्हणे 2 मे पासून गुजरात, केरल,​ तमिलनाडु, आंध्रप्रदेश व तेलांगना, मध्यप्रदेश व छत्तीसगढ तसेच महाराष्ट्र व गोवा सर्किल मध्ये आयडिया ची वोएलटीई सेवा सुरू झाली आहे. आयडिया कडून मिळणारा 10जीबी 4जी डाटा याच वोएलटीई सर्विस आनंदात दिला जात आहे. जर तुम्ही पण वरील कोणत्याही सर्किल मध्ये आ​यडिया चा नंबर वापरत असाल तर खाली दिलेल्या स्टेप्स मधून 10जीबी डाटा फ्री मिळवू शकता.

1. 4जी वोएलटीई सर्पोटिड स्मार्टफोन मध्ये आयडिया सिम वापरा.

2. स्मार्टफोन सॉफ्टवेयर अपडेट करा.

3. अपडेट करण्यासाठी : सेटिंग्स -> सिस्टम अपडेट -> डाउनलोड अ‍ॅन्ड इंस्टाल मॅन्युअली

4. अपडेट होताच वोएलटीई बटन चे स्वीच आॅन करा.

5. कोणत्याही नंबर वर आयडिया नेटवर्क वरून पहिला वोएलटीई कॉल करा.

आ​यडिया नेटवर्क वरून पहिला वोएलटीई कॉल करताच तुम्ही 10जीबी फ्री डाटा चे हकदार बनाल. कंपनी कडून 48 तासांच्या आत 10जीबी डाटा तुमच्या आयडिया नंबर वर क्रेडिट केला जाईल. साहजिकच हा फ्री डाटा आयडिया नंबरवर आधी पासून चालू असलेल्या कोणत्याही टॅरिफ प्लान मध्ये आपोआप जोडला जाईल.