Home बातम्या फक्त 5,774 रुपयांमध्ये लॉन्च झाला हा Made in India फोन, चीनी कंपन्यांना मिळेल आता भारतीय ब्रँडस कडून आव्हान

फक्त 5,774 रुपयांमध्ये लॉन्च झाला हा Made in India फोन, चीनी कंपन्यांना मिळेल आता भारतीय ब्रँडस कडून आव्हान

देशात चालू असलेल्या बॉयकॉट चायना कॅम्पेन अंतर्गत चीनी कंपन्या व ब्रँडसचा बहिष्कार केला जात आहे. लोक चीनी कंपन्यांनी बनवलेले प्रोडक्ट्स विकत घेण्यास नकार देत आहेत तसेच ‘मेड इन इंडिया’ वर जोर देत आहेत. देशातील स्मार्टफोन बाजारात चीनी कंपन्यांचा मोठा वाटा आहे आणि त्यामुळे मोबाईल यूजर्स समोर समस्या आहे कि चीनी कंपन्यांचा बॉयकाट केल्यावर कोणत्या ब्रँडचा फोन घ्यावा. भारतीय ग्राहकांच्या गरज समजून देशी मोबाईल कंपन्या पण काम करत आहे. परिणामी भारतीय मोबाईल कंपनी लावाने आज मार्केट मधील एक स्वस्त आणि नवीन स्मार्टफोन Lava Z61 Pro लॉन्च केला आहे.

Lava Z61 Pro कंपनीने फक्त 5,774 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे जो ऑनलाईन शॉपिंग साइट्स सोबतच देशातील ऑफलाईन बाजार व रिटेल स्टोर्स वर पण विक्रीसाठी उपलब्ध होईल. लावा झेड61 प्रो पूर्णपणे ‘मेड इन इंडिया’ फोन आहे कमी किंमतीत स्मार्टफोन वापरणाऱ्या यूजर्ससाठी बेस्ट ऑप्शन बनला आहे. हा फोन Midnight Blue आणि Amber Red कलर मध्ये विकत घेता येईल जो आज पासून बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे.

Lava Z61 Pro

लावाच्या या लेटेस्ट स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन बेजल लेस डिजाईन वर सादर केला गेला आहे ज्यात कोणतीही नॉच देण्यात आलेली नाही. कंपनीने हा फोन 18:9 आस्पेक्ट रेशियो असलेल्या स्क्रीन वर लॉन्च केला गेला आहे जो 5.45 इंचाच्या एचडी+ फुलव्यू डिस्प्लेला सपोर्ट करतो. डिस्प्लेच्या बेजल वर स्पीकर आणि सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

Lava Z61 Pro कंपनीने एंडरॉयड ओएस वर सादर केला आहे जो 1.6गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेक चिपसेट वर चालतो. इंडियन मार्केट मध्ये लावा झेड61 प्रो 2 जीबी रॅम वर आला आहे जो 16 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोन मेमरी माइक्रोएसडी कार्डने 128 जीबी पर्यंत वाढवता येते.

लावा चा हा फोन सिंगल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो जो फ्लॅश लाईट सह बॅक पॅनल वर उजवीकडे वर्टिकल शेप मध्ये आहे. या सेटअप मध्ये 8 मेगापिक्सलचा कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी Lava Z61 Pro फोन 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. झेड61 प्रो चा कॅमेरा एचडीआर, नाइट मोड, पॅनोरमा आणि ब्यूटी मोड सोबत बोका इफेक्ट सारख्या फीचर्स सह येतो.

Lava Z61 Pro एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स आणि 3.5एमएम जॅक सोबतच सिक्योरिटीसाठी हा फोन फेस अनलॉक फीचरला सपोर्ट करतो तसेच पावर बॅकअपसाठी या फोन मध्ये ओटीजी फीचर असलेली 3,100एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. लावा झेड61 प्रो 5,774 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

लावा झेड61 वीडियो