Home टॉप कलेक्शन New Communication Rule चा मेसेज होतोय वायरल

New Communication Rule चा मेसेज होतोय वायरल

भारतात New Communication Rule लागू होणार आहेत! या नियमांनुसार प्रत्येक व्यक्तीचे फोन कॉल्स रेकॉर्ड केले जातील. तसेच WhatsApp, Facebook व Twitter सह सर्व प्रकारच्या Social Media चॅनेल्सवर सरकारची नजर असेल! असा मेसेज तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपवर आला आहे का? या मेसेजमध्ये भारत सरकार ‘नवीन संचार नियम’ अंतर्गत सोशल मीडिया आणि फोन कॉलवर लक्ष ठेवणार आहे, असा दावा करण्यात आला आहे. तुम्हाला देखील New Telecom Rules बद्दल प्रश्न पडले असतील तर तुमच्या शंकांचं निरसन आम्ही पुढे केलं आहे.

असे आहेत New Telecom Rules / New Communication Rule

‘भारत सरकार नवीन संचार नियम लागू करणार आहे’, अशी माहिती देणारा एक मेसेज वणव्याप्रमाणे पसरत आहे आणि लोक देखील व्हॉट्सअ‍ॅप तसेच अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर न विचार करता शेयर करत आहेत. हा Viral Message वाचून लोक थक्क झाले आहेत. मेसेजमध्ये दावा करण्यात आला आहे की, भारत सरकार ‘नवीन संचार नियम’ अंतगर्त सोशल मीडिया आणि फोन कॉलवर लक्ष ठेवणार आहे. जर तुम्ही अजूनपर्यंत हा मेसेज वाचला नसेल तर पुढे आम्ही त्यातील मजकूर दिला आहे.

असा आहे नवीन संचार नियमांचा व्हायरल मेसेज

व्हॉट्सअ‍ॅप आणि फोन कॉलसाठी नवीन संचार नियम उद्यापासून लागू होतील :-

01. सर्व कॉल रेकॉर्ड केले जातील.

02. सर्व कॉल रेकॉर्डिंग साठवून ठेवल्या जातील.

03. व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, ट्विटर आणि सर्व सोशल मीडियावर नजर ठेवली जाईल.

04. ज्यांना माहित नाही त्यांना सांगा.

05. तुमची उपकरणं मंत्रालय प्रणालीशी जोडली जातील.

06. सावधान राहा कोणालाही चुकीचे संदेश पाठवू नका.

07. तुमच्या मुलांना, भावंडाना, नातेवाईकांना, मित्रांना ओळखीच्या लोकांना सांगा की तुम्हाला त्यांची देखील काळजी घ्यावी लागेल जे क्वचित सोशल साईट्स वापरतात.

08. राजकारण किंवा सध्य स्थितीवर सरकार किंवा पंत्रप्रधानांसमोर तुमची कोणतीही पोस्ट किंवा व्हिडीओ…पाठवू नका.

09. सध्या कोणत्याही राजकीय किंवा धार्मिक विषयवार लिहणं किंवा संदेश पाठवणं गुन्हा आहे…असे केल्यास वॉरंटविना अटक होऊ शकते.

10. पोलीस नोटिफिकेशन जारी करतील…त्यानंतर सायबर क्राइम…त्यानंतर कारवाई, हे खूप गंभीर आहे.

11. कृपया तुम्ही सर्व, ग्रुपचे सदस्य, प्रशासक,.. कृपया या विषयवार विचार करा.

12. सावधान राहा चुकीचा मेसेज पाठवू नका आणि सर्वाना सांगा आणि या विषयावर लक्ष ठेवा.

13. कृपया हे शेयर करा.

नवीन संचार नियमांचे सत्य

भारत सरकारच्या नावाने नवीन संचार नियम जे व्हॉट्सअ‍ॅप तसेच इंटरनेटवर व्हायरल होत आहेत ते पूर्णपणे खोटे आहेत. सरकारनं कोणतेही New Telecom Rules किंवा New Communication Rule लागू केले नाहीत. तसेच सामान्य लोकांचे कॉल रेकॉर्ड करण्याचा सरकारचा मानस नाही.

पीआईबी फॅक्टचेकनं या व्हायरल मेसेजची पडताळणी करून याला ‘फेक’ घोषित केलं आहे. हा मेसेज पूर्णपणे खोटा आहे. 91मोबाईल्सच्या वाचकांनी असा कोणताही मेसेज फॉरवर्ड करू नये अशी विनंती आम्ही करत आहोत. तसेच लोकांमध्ये भीती निर्माण करणारे कोणतेही मेसेज शेयर न करण्याचा सल्ला दिला जात आहे.